Pune Palkhi Sohla: पुणे मनपाकडून गोरगरीब वारकऱ्यांची लूट, धक्कादायक VIDEO समोर, मोफत सेवेचा दावाही खोटा

पुण्यामध्ये वारीतील वारकऱ्यांची मोठी लूट होत असून शौचालय वापरण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Palkhi Sohala News: महाराष्ट्राचं आध्यात्मिक वैभव असलेल्या आषाढी वारी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत मुक्कामी आहेत. एकीकडे वारीतील वारकऱ्यांसाठी पुणे महानगरपालिकेने आवश्यक सर्व उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य सुविधा, आणि सुरक्षा यंत्रणा पुरवल्या आहेत, अशातच पुण्यामध्ये वारीतील वारकऱ्यांची मोठी लूट होत असून शौचालय वापरण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Train Cancelled: मोठी बातमी! डेक्कन क्वीनसह 30 एक्सप्रेस रद्द, 17 जुलैपर्यंत कोणकोणत्या गाड्या धावणार नाहीत?

पुणे मनपाकडून वारकऱ्यांची लूट, धक्कादायक VIDEO 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यात गोरगरीब वारकऱ्यांची महानगरपालिकेकडून लुट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वारकऱ्यांकडून पुणे महानगरपालिकेचे शौचालय वापरण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे महानगरपालिकेने वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचा दावा केला होता, मात्र वारकऱ्यांकडून शौचालय वापरण्यासाठी पैसे घेत असल्याने मनपाचा दावा खोटा निघाल्याचे दिसत आहे. 

Advertisement

शहरातील गंजपेठेतील सोनवणे रुग्णालयासमोरील मनपाचे शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराकडून पैशांची मागणी होत असल्याने वारकऱ्यांमधे नाराजी पसरली. एका सजग नागरिकाने याबाबता व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. वारकऱ्यांकडून सुलभ शौचालयातील व्यक्ती २०-२० रुपये शौचालयाचे मागत आहे, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. यावर आता पुणे महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Solapur News: 115 वर्षांचा लढा संपला! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक निर्णय, विधानसभेत मोठी घोषणा; 9000 कुटुंबांना..