जाहिरात

Train Cancelled: मोठी बातमी! डेक्कन क्वीनसह 30 एक्सप्रेस रद्द, 17 जुलैपर्यंत कोणकोणत्या गाड्या धावणार नाहीत?

सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील अप (UP) आणि डाऊन (DN) अशा दोन्ही लाईन्स वाहतुकीसाठी तातडीने बंद केल्या आहेत.

Train Cancelled: मोठी बातमी! डेक्कन क्वीनसह 30 एक्सप्रेस रद्द, 17 जुलैपर्यंत कोणकोणत्या गाड्या धावणार नाहीत?

Mumbai Pune Train Cancelled News:  राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या करजत - लोणावळा सेक्शनमधील खंडाळा ते मंकीहिल दरम्यान (विशेषतः ठाकूरवाडी आणि मंकी हिल या अतिसंवेदनशील भागात) आज मोठ्या प्रमाणावर भूस्खलन (दरड) झाले. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील अप (UP) आणि डाऊन (DN) अशा दोन्ही लाईन्स वाहतुकीसाठी तातडीने बंद केल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  निसर्गाच्या या प्रकोपामुळे मध्य रेल्वेने १० जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ या आठवडाभराच्या कालावधीसाठी मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनसह एकूण 30 प्रमुख एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सुरक्षितता सर्वोपरि असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर ढिगारा उपसण्याचे आणि मार्ग मोकळा करण्याचे काम करत आहे.

Solapur News: 115 वर्षांचा लढा संपला! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक निर्णय, विधानसभेत मोठी घोषणा; 9000 कुटुंबांना..

कोणकोणत्या गाड्या रद्द? 

 १२१२३/१२१२४ डेक्कन क्वीन १२१२७/१२१२८ इंटरसिटी एक्सप्रेस, ११००७/११००८ डेक्कन एक्सप्रेस, १७४११/१७४१२ कर्नाटक एक्सप्रेस आणि २२१५७/२२१५८ चेन्नई मेल या प्रमुख गाड्या १० ते १७ जुलै दरम्यान पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय इंदूर एक्सप्रेस (२२९४३/२२९४४), हैदराबाद एक्सप्रेस (२२७३१/२२७३२) आणि अजमेर एक्सप्रेस (२०४९५/२०४९६) या इतर मार्गांवरील गाड्याही विविध तारखांना रद्द राहतील.

 याशिवाय, हुबळी-दादर एक्सप्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस, दौंड-इंदूर एक्सप्रेस आणि चेन्नई एक्मोर एक्सप्रेस या गाड्या दोन्ही दिशांनी रद्द करण्यात आल्या आहेत. महालक्ष्मी एक्सप्रेस, जोधपूर-हडपसर एक्सप्रेस आणि सातारा-दादर एक्सप्रेस यांसह 8 गाड्या 10 ते 17 जुलै दरम्यान ठराविक तारखांना रद्द राहतील. यामध्ये 8 विशेष गाड्यांचाही समावेश असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस सुरू, तिकिटांचा पूर्ण रिफंड मिळणार

दरम्यान, या संपूर्ण गोंधळात पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सिंहगड एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेनुसार धावणार आहेत, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या माहितीसाठी नोटीस बोर्ड आणि अनाउन्समेंट सिस्टीम (PA System) द्वारे सतत सूचना दिल्या जात आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातूनही अपडेट्स दिले जात आहेत. रद्द झालेल्या सर्व गाड्यांच्या तिकिटांचा पूर्ण परतावा (Full Refund) प्रवाशांना मिळणार आहे.

 प्रवाशांना पर्यायी मार्गाचा सल्ला

पावसाळ्यात खंडाळा घाटात दरड कोसळण्याच्या घटना नव्या नसल्या तरी सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी १३९ या क्रमांकावर संपर्क साधून किंवा IRCTC App वर आपल्या गाडीचे स्टेटस तपासूनच प्रवास करावा. तसेच, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे पुणे-मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना आता NH-48 (मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग) या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.
प्रशासनाने प्रवाशांना या कठीण प्रसंगात संयम राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com