Pune News: भाविकांसाठी महत्त्वाचं! श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शन लांबणीवर, मंदिर पुन्हा 'इतके' महिने बंद

भीमाशंकर येथेही भाविक गर्दी करत असतात. या गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे काम सध्या सुरु आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे

Pune Bhimashankar Temple Closed:  बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भीमाशंकर मंदिर आणखी 53 दिवस बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी तथा  जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Nashik News: दिंडोरी पुन्हा हादरलं! 4 शाळकरी मुलांच्या मृत्यूने हळहळ, घराबाहेर पडले अन्...

भीमाशंकर मंदिर बंद!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले भीमाशंकर मंदिरात सुरू असलेल्या सभामंडप व परिसर विकास कामांमुळे, तसेच कुंभमेळा पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी आणि सुरक्षिततेचा विचार करून ९ एप्रिल ते ३१ मे २०२६ दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वीही मंदिर तीन महिन्यांपासून बंद होते, आणि आता पुन्हा पावणे दोन महिने बंद राहणार असून पावसाळ्यापूर्वी मंदिर खुले करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

Advertisement

दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा नाशिक येथे भरणार आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथेही नियोजन सुरु झाले आहे. कुंभमेळ्याच्या काळात भीमाशंकर येथेही भाविक गर्दी करत असतात. या गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे काम सध्या सुरु आहे.  

भीमाशंकर येथे नवीन सभामंडप उभारण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर पायरी मार्ग, मंदिरातील विविध विकासकामे वेगाने सुरु आहे. या सर्व कामांमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! पुन्हा 4 मुलींसह एका मुलाचे अपहरण, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण