अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Crime: पुण्यातील खडकी येथून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा राजगड तालुक्यातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमर राजेंद्र कदम (वय 27) असं या युवकांच नाव आहे. 'Everyone Sorry' असा स्टेटस मोबाईलवर ठेवला असल्याची माहितीही समोर आल्याने.. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
PCMC News: अखेर 'स्मार्ट सिटी'ला गाशा गुंडाळण्याचे आदेश! राज्य सरकारचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील खडकी येथील अमर राजेंद्र कदम (वय 27) हा युवक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता..याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती..दरम्यान, साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर भागात त्यांचे ओळखपत्र, कपडे, मोबाईल आदी वस्तू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली..
घटनेची माहिती साईव खुर्द येथील पोलीस पाटील रुपाली पंडीत यांनी संबंधित यंत्रणांना दिली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टीम घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक पाहणीत संबंधित ठिकाणी पाण्याचा खोल प्रवाह असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तातडीने शोधमोहीम राबविण्यात आली.
काही वेळाच्या शोधानंतर पाण्यातून अमर कदम यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांनी ‘Everyone Sorry' असा स्टेटस मोबाईलवर ठेवला असल्याची माहितीही समोर आली आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी अनिकेत सोनवणे, निवास जगदाळे, मंगेश कदम यांच्यासह हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे गणेश सपकाळ, संजय चोरघे, नारायण जावळकर, संतोष भगत आदींनी सहभाग घेतला. घटनेचा पुढील तपास खडकी पोलीस करत असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Bhandara Accident News: लग्नघरावर काळाचा घाला! वऱ्हाडाच्या व्हॅनला ट्रकची धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world