Pune Crime : पार्किंगचं क्षुल्लक कारण, पुण्यात भररस्त्यात भारतीय सैन्य दलातील माजी अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या; एकाचा मृत्यू

पुण्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना हा मोठा गहन प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

पुण्यातील येरवडाच्या अशोक नगर परिसरामध्ये  गोळीबार झाल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार उघडकीस आला आहे. भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका माजी अधिकाऱ्याने पार्किंगच्या कारणावरुन एका व्यक्तीवर बंदुकीतून गोळी झाडली. यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. श्रीकांत पाटील असं आरोपीचं नाव असून मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख शाहनवाज शेख अशी झाली आहे. 

नक्की वाचा - कोंडीत मुंबईतील 22 किलोमीटरचे अंतर 19 मिनिटात पार, रुग्णाला मिळालं जीवनदान

पुण्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना हा मोठा गहन प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. कोयता गँगची दहशत असो की काही दिवसांपूर्वी मोबाइल हॉटस्पॉटच्या वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याचं प्रकरण असो. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढही झाल्याचं दिसून येत आहे.