Pune News: मस्करी अंगलट आली! अल्पवयीन मुलावर पिस्तुल रोखलं, चुकून गोळी सुटली अन्... पुण्यात भयंकर घडलं!

परवाना नसताना बाळगलेल्या पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा  गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins

 अजिंक्य धायगुडे, पुणे 

Pune Crime:  पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर येथे धक्कादायक गोळीबाराची  घटना समोर आली होती. या गोळीबारामध्ये एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला होता. सुरुवातीला महाकाल टोळीने हा गोळीबार केल्याची शक्यता वर्तवली होती, मात्र आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून पिस्तूल मित्रांना दाखविताना ही गोळी लागल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

मित्राला बंदुक दाखवताना गोळी सुटली अन्... 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, परवाना नसताना बाळगलेल्या पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा  गंभीर जखमी झाल्याची घटना मुंढव्यातील केशवनगर भागात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

Ashok Kharat Case: अशोक खरातचा लोकांना फसवण्याचा 'रिमोट कंट्रोल' पॅटर्न, पैसे कसे उकळायचा?

 गोळीबारात जखमी झालेला अल्पवयीन हा हडपसर रेल्वे स्थानक परिसरातील गुलमोहोर काॅलनीत राहायला आहे. १८ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गायकवाड, मुंडे आणि अल्पवयीन युवक हे मुंढव्यातील केशवनगर भागात असलेल्या गुरुकृपा सोसायटीच्या परिसरात मोकळ्या जागेत थांबले होते. आरोपी मुंडे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होत.

अल्पवयीन मुलगा जखमी.. 

आरोपी पिस्तूल हाताळत होते. पिस्तूल उगारून ते एकमेकांना दाखवीत होते. त्या वेळी तेथे अल्पवयीन थांबला होता. त्यानेही पिस्तूल हाताळले. त्यानंतर मुंडे याने पिस्तूल घेतले आणि अल्पवयीनाच्या दिशेने रोखले. पिस्तुलाचा चाप ओढल्यानंतर गोळी सुटली आणि अल्पवयीन मुलाच्या कंबरेत शिरले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीनाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक निरीक्षक पिंगुवाले तपास करत आहेत. शहरात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचे प्रकार वाढले आहेत. दहशत माजविण्यासाठी सराइतांकडून पिस्तूल बाळगले जाते. आरोपी तरुणांवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सक्षम युवराज गायकवाड (वय १९), ओम दुर्गा गायकवाड (वय १९, दोघे रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा), सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमीत सुजित बर्णवाल (वय २१, रा. मांजरी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune News: 'महाराष्ट्र केसरी'चा किताब जिंकताच निवृत्ती! कुस्तीप्रेमी चक्रावले; हर्षवर्धन काय म्हणाला?

Topics mentioned in this article