Pune News: अवघ्या 3 महिन्यात संसार संपला, पुण्यात नवविवाहितेची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ८० (हुंडाबळी) आणि ८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Baner Crime: पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडवली होती. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. अशीच आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातील बाणेर परिसरात घडली आहे. १९ फेब्रुवारी रोजी बाणेरमधील एका निवासी इमारतीच्या ८ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारुन विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि त्याच्या पालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विवाहितेची आत्महत्या, इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील बाणेर परिसरात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या पत्नीने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. १९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून, गुरुवारी पीडितेच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

Mulshi News: खंडोबा मंदिरात गैरप्रकार! गाभाऱ्यातून शिवलिंग पळवले; ग्रामस्थांचा संताप, मुळशीत काय घडलं?

कर्नाटक येथील तक्रारदार यांच्या ३१ वर्षीय मुलीचा विवाह गेल्या नोव्हेंबर महिन्यात संबंधित सॉफ्टवेअर इंजिनिअरशी झाला होता. लग्नाच्या वाटाघाटी दरम्यान सासरच्या मंडळींनी कोणतीही अपेक्षा नसल्याचे भासविले होते. मात्र, प्रत्यक्षात साखरपुड्यापासूनच वादाची ठिणगी पडली. आहेर आणि भेटवस्तूंच्या कारणावरून सासरच्यांनी मुलीच्या वडिलांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ​विवाहाच्या वेळी वधू पक्षाकडून २१० ग्रॅम सोने देण्यात आले होते, तरीही लग्नमंडप आणि इतर व्यवस्थांवरून सासरच्यांनी मोठा राडा केला होता. 

सासरच्यांकडून छळ, सोन्यासाठी दबाव

लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच पीडितेचा छळ सुरू झाला. तिच्या शारीरिक सौंदर्यावरुन तिला सातत्याने टोमणे मारले जात होते आणि माहेरून आणखी २१० ग्रॅम सोने घेऊन येण्यासाठी दबाव टाकला जात होता. या जाचाला कंटाळून अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. 19 फेब्रुवारी रोजी विवाहितेने ८ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ८० (हुंडाबळी) आणि ८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Ajit Pawar: अजित दादा गेले! महाराष्ट्र सुन्न करणाऱ्या घटनेला 1 महिना पूर्ण; 30 दिवसात काय- काय घडलं?

Topics mentioned in this article