जाहिरात

Mulshi News: खंडोबा मंदिरात गैरप्रकार! गाभाऱ्यातून शिवलिंग पळवले; ग्रामस्थांचा संताप, मुळशीत काय घडलं?

शिवलिंगाची तोडफोड करून त्याची चोरी केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mulshi News: खंडोबा मंदिरात गैरप्रकार! गाभाऱ्यातून शिवलिंग पळवले; ग्रामस्थांचा संताप, मुळशीत काय घडलं?

Mulshi News:  मुळशी तालुक्यातील मुलखेड येथील डोंगरावरील खंडोबा मंदिरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. अज्ञात समाजकंटकांनी मंदिरातील शिवलिंगाची तोडफोड करून त्याची चोरी केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या..

शिवलिंगाची चोरी, मुळशीत खळबळ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुलखेड गावाच्या हद्दीतील डोंगरावर असलेल्या खंडोबा मंदिरातील शिवलिंग लंपास करण्यात आले. स्थानिक नागरिक शिवाजी रघुनाथ तापकीर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासचक्र फिरवली आहेत.

Ajit Pawar: अजित दादा गेले! महाराष्ट्र सुन्न करणाऱ्या घटनेला 1 महिना पूर्ण; 30 दिवसात काय- काय घडलं?

या घटनेनंतर मंदिर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चोरी झालेल्या ठिकाणी नवीन शिवलिंगाची स्थापना करून मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.

तर येत्या ११ मार्चपर्यंत आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. परिसरात भाड्याने राहणाऱ्या सर्व बाहेरील व्यक्तींची माहिती आणि त्यांचा भाडेकरार पोलीस ठाण्यात जमा करणे आता घरमालकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. पौड पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

Palghar News: हृदयद्रावक! पाण्याचा अंदाज चुकला, अनर्थ घडला; बंद दगड खाणीत बुडून 2 मुलांचा मृत्यू

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com