Pune Crime: डोक्यात अडकला कोयता; तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचला, पुण्यात भयंकर घडलं!

डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न करुन कोयता काढून तरुणाचे प्राण वाचवले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे, पुणे:

Pune Crime News:  पुणे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. शहरात महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद अन् कोयते हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या वाघोलीमध्ये एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. यामध्ये एक वार इतका भयंकर होता की या तरुणाच्या डोक्यात कोयता अडकला अन् त्याच अवस्थेत तो रुग्णालयात पोहोचला, सुदैवाने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्याचे प्राण वाचवले.

तरुणावर वार, डोक्यात कोयता अडकला 

समोर आलेल्या माहितीनुसार, वाघोलीमध्ये कॉलेज तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवी दिल्याच्या कारणावरून महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद झाला आणि तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या कोयता हल्ल्यात  नागेश सुनिल जगताप हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मंगेश सांगळे (वय २३, रा. शिवतेज पार्क, वाघोली), पवन राठोड (वय १८, रा. डोमखेल वस्ती, वाघोली)  या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

Advertisement

Bhayandar News: हलगर्जीपणाचा कळस! रुग्णालयात उंदराने महिलेला कुरतडले, भाईंदरमधील घटना

ही घटना वाघोलीतील रायसोनी कॉलेज गेट समोरील अखंड अमृततुल्य हॉटेल येथे १२ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. हल्ला झालेला तरुण नागेश जगताप हा आपल्या मित्रासह हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी त्याठिकाणी आरोपी मंगेश सांगळे आणि पवन राठोड हे दोघे आले. तु मला शिवी का दिलीस? असं म्हणत आरोपींनी नागेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. 

या वादातूनच आरोपींनी तरुणावर कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी नागेशवर कोयत्याने वार केले, यापैकी एक वार इतका जोरदार होता की कोयता थेट तरुणाच्या डोक्यात अडकला. त्याच अवस्थेत इतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न करुन कोयता काढून तरुणाचे प्राण वाचवले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. 

VIDEO: "गॅस संपला तर काळजी नको", लग्नात नवरा-नवरीला दिलं 'असं' गिफ्ट, वऱ्हाडी मंडळी कोमात