जाहिरात

VIDEO: "गॅस संपला तर काळजी नको", लग्नात नवरा-नवरीला दिलं 'असं' गिफ्ट, वऱ्हाडी मंडळी कोमात

गॅसच्या संकटावर उपाय म्हणून कोल्हापुरकरांनी उपाय शोधला असून लग्न सोहळ्यात नवरा- नवरीला दिलेल्या खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. 

VIDEO: "गॅस संपला तर काळजी नको", लग्नात नवरा-नवरीला दिलं 'असं' गिफ्ट, वऱ्हाडी मंडळी कोमात

विशाल पुजारी, कोल्हापूर:

Kolhapur Unique Girt In Wedding VIDEO:  अमेरिका, इस्त्रायल- इराण युद्धाची जगभरात झळ पोहोचत आहे. या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे. गॅस लवकर मिळत नसल्याने स्वयंपाक करायचा कसा?  असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.   व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने लग्न सोहळ्यांवरही मोठा परिणाम होत आहे. या गॅसच्या संकटावर उपाय म्हणून कोल्हापुरकरांनी उपाय शोधला असून लग्न सोहळ्यात नवरा- नवरीला दिलेल्या खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. 

Mumbai News : मुंबईतील रिक्षाचालकाची कमाई पाहून BTech झालेल्या तरुणाला धक्का; म्हणाला इथंच येऊन...

गॅस संपला तर टेन्शन नको, लग्नात दिलेल्या गिफ्टची चर्चा 

आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर एका नवदाम्पत्याला लग्नात त्यांच्या मित्रमंडळींनी दिलेल्या गिफ्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. लग्नानंतर नवा संसार सुरु करताना गॅस संपला तर टेन्शन नको म्हणून नवरा- नवरीला चक्क चूल आणि गोवऱ्या गिफ्ट म्हणून देण्यात आल्यात. 

कोल्हापूरच्या कागलमधील वंदूर या गावातील तरुणाला मित्रमंडळीनी हे विशेष गिफ्ट दिलंय, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.  महेश कांबळे आणि सोनिया यांच्या विवाहातील हा गिफ्ट देण्याचा प्रसंग सोशल मीडियावर चर्चेत आहे. गॅस टंचाईवर 'भविष्यातील उपाय' म्हणून थेट लग्नाच्या मांडवात एक नवी कोरी चूल आणि जळणासाठी लागणाऱ्या शेणी अशी अनोखी भेट दिली.

Ahilyanagar News: पारनेर हादरलं! कीर्तनकार महाराजाचं नराधम कृत्य; अमानुष छळ करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल 

सुरुवातीला हे गिफ्ट पाहून लग्नसोहळ्यास  उपस्थित पाहुणे आणि नवदाम्पत्यही चकित झालं  मात्र, जेव्हा मित्रांनी "गॅस संपला तर काळजी नको, ही चूल कामाला येईल," असे मिश्किलपणे सांगितले, तेव्हा संपूर्ण मांडवात एकच हशा पिकला. सोशल मीडियावर या अनोख्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com