सुरज कसबे, पुणो
Pune Chakan Theft News: पैशांची, दागिन्यांची चोरी झालेल्या अनेक बातम्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील. मात्र चाकणमध्ये एक अशी चोरी झाली आहे जी ऐकून तुम्हीही चक्रावून जालं. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात चोरट्यांनी मोठे मेडिकलचे दुकान फोडले. मात्र या धाडसी चोरीत त्यांनी फक्त कंडोम, कॅडबरी आणि इंडू बॉम्बचे बॉक्सच चोरुन नेले. या चोरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
Pune VIDEO: टायमर बॉम्बसदृश्य वस्तूमुळे पुण्यात खळबळ! आरोपीचा हादरवणारा CCTV समोर
चाकणमध्ये अजब चोरी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील खराबवाडी येथे एका मेडिकल दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील महागड्या औषधांऐवजी कंडोम, कॅटबरी आणि झंडू बॉम्बचे बॉक्स चोरून नेल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या चोरट्यांनी केलेल्या या अजब चोरीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील माही मेडिकलमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड आणि इतर साहित्यासोबतच त्यांनी कंडोम, चॉकलेट्स आणि झंडू बॉम्बचे बॉक्स लंपास केले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सोशल मीडियावर तुफान चर्चा
पहाटेच्या वेळी शांतता असताना चोरट्यांनी हा हातसाफ केला. चोरीचा हा प्रकार आणि चोरट्यांनी चोरून नेलेल्या वस्तूंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या चोरट्यांच्या अजब प्रतापाची सर्वत्र चर्चा होत आहे.