
पुणे: डीपॉझिट न भरल्यामुळे उपचार थांबवल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली होती, ज्यानंतर याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून सरकारने कठोर भूमिका घेत प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात सरकार कठोर भूमिकेत असून प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डॉ. घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुर्हाड कायम असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे प्रकरणात विविध स्तरांमधून चौकशी आणि त्यातून झालेली कारवाईही समोर आली आहे.
1) वैद्यकीय शिक्षण विभागाची चौकशी
पुणे पोलिस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठी अहवाल
2) सार्वजनिक आरोग्य विभाग चौकशी
- इंडियन मेडिकल कौन्सिलच्या व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाल्याने मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून डॉ. घैसास आणि त्यांच्या कर्मचार्यांवर कारवाई करावी.
- महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 नुसार पुणे महापालिकेने कार्यवाही करावी.
- मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 चा भंग झाल्याने विधी व न्याय विभागाने धर्मादाय आयुक्तांमार्फत कारवाई करावी.
3) विधी व न्याय विभाग चौकशी
- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड.
- यातून प्रत्येकी 5 लाखांच्या एफडी होणार. दोन्ही मुली सज्ञान झाल्यावर व्याजासह त्यांना ही रक्कम द्यावी.
- या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून याचा निर्णय आधीच घेण्यात आला.
याशिवाय, धर्मदाय रुग्णालय व्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित
1) आता धर्मदाय रुग्णालयातील रुग्णसेवा ही संपूर्णत: ऑनलाईन ठेवावी लागणार.
2) त्यांचे केंद्रीय स्तरावरून नियोजन मुख्यमंत्री धर्मदाय कक्षाच्या माध्यमातून होईल.
3) धर्मादाय रुग्णालयात येणार्या कोणत्याही रुग्णाला अॅडव्हान्स मागता येणार नाही.
4) धर्मादाय रुग्णालयाने 10 टक्के निधी हा गरिब रुग्णांसाठी वापरला की नाही, याचे लेखे नियमितपणे सादर करावे लागणार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world