जाहिरात

Pune News: पुणेकरांनो सावधान! शहराला रोगराईचा विळखा; तब्बल 5,500 रुग्ण... आरोग्य यंत्रणा अलर्ट

पुण्यामध्ये डेंग्यू तसेच हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. शहरात डेंग्यु, मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Pune News: पुणेकरांनो सावधान! शहराला रोगराईचा विळखा; तब्बल 5,500 रुग्ण... आरोग्य यंत्रणा अलर्ट

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Pune Dengue and Malaria Surge 2026:  पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अन् चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पावसाच्या दमदार हजेरीनंतर पुणे शहरात रोगराई वाढू लागली आहे. पुण्यामध्ये डेंग्यू तसेच हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. शहरात डेंग्यु, मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Ashadhi Ekadashi: सलग 20 वर्ष पंढरीची वारी, यंदा मिळाला आषाढी पुजेचा मान; कोण आहे 'ते' भाग्यवान दांपत्य?

पुणेकरांनो काळजी घ्या.. शहराला रोगराईचा विळखा! 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यंदा झालेल्या मुसळधार आणि दमदार पावसामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे शहरात डेंग्यू आणि हिवतापासारख्या (मलेरिया) साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पुणे शहरात २१ जुलै २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, डेंग्यूचे तब्बल ३,७६२ रुग्ण नोंदवले गेले आहेत.

तर हिवतापाच्या रुग्णांची संख्या २,०३६ वर पोहोचली आहे. ही वाढती आकडेवारी महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी चिंतेची ठरली असून, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने आता युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील वाढत्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

प्रशासनाकडून खबरदारी! 

ज्याअंतर्गत शहरातील विविध भागांत घरोघरी जाऊन ताप सर्वेक्षण करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तसेच संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने गोळा करून त्यांची तातडीने तपासणी केली जात आहे. प्रतिबंधात्मक उपायांचा एक भाग म्हणून दाट वस्त्यांमध्ये आणि पाणी साचणाऱ्या परिसरामध्ये प्रभावी कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांतून व्यापक मोहीम राबवली जात असून, डेंग्यू आणि हिवतापाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Ashadhi Ekadashi: विठुरायाच्या गजराने दुमदुमली पंढरी! CM देवेंद्र फडणवीसांकडून शासकीय महापूजा संपन्न

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com