पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण, पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड 

पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी

पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून ही पार्टी ठरवण्यात आली होती तसेच यामध्ये गॅरेज चालक आणि चायनीज गाडीवाल्यांचाही सहभाग होता,अशी माहिती समोर आली आहे. पोलीस तपासामध्ये आणखी कोणती माहिती समोर आली आहे, जाणून घेऊया सविस्तर...

(नक्की वाचा: पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM शिंदेंचे मोठे पाऊल, पोलीस आयुक्तांना दिले हे निर्देश)

पोलीस चौकशीमध्ये समोर आलेली माहिती

1. लिक्विड लेझर लाउंज हॉटेलमध्ये रविवारी (23 जून) मध्यरात्री दीड वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत 40 ते 50 लोकांनी ड्रग्ज पार्टी केली.
2. चौकशीदरम्यान पार्टीमध्ये गॅरेज चालक, चायनीज सेंटर चालक, खासगी कंपनीमध्ये काम करणारे नोकरदार यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
3. इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून ठरलेल्या या पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांची ओळखपत्रे, वयाची मर्यादा, मद्यसेवन परवाने न पाहताच त्यांना मद्यपुरवठा केल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. 
4. साडेतीन तासांच्या पार्टीमध्ये रोख आणि ऑनलाइन स्वरुपात या लोकांनी 80 ते 85 हजार रुपये खर्च केले.

Advertisement

(नक्की वाचा: पुण्यात चाललंय काय ! सांस्कृतिक राजधानीला पडलाय ड्रग्जचा विळखा)

5. पार्टीमध्ये सहभागी झालेले तरुण पुण्यातील विविध भागातील रहिवासी असून ते वेगवेगळ्या बार, पबमध्ये रात्रीच्या वेळ पार्ट्यांसाठी भेटत असतात. सुरुवातीला त्यांनी हडपसर परिसरातील क्लर्ट या हॉटेलमध्ये मध्येरात्री 1 ते दीड वाजेपर्यंत पार्टी केली.
5. याबाबत रात्रपाळीवरील पोलिसांनी नोंद देखील केली. पण इव्हेंट मॅनेजर अक्षय कामठे, डीजे चालक दिनेश मानकर यांनी पब चालकांना फोन करून एका समूहाला नाइट पार्टी करायची आहे, ते पैसे देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार बंद करण्यात आलेला पब मध्यरात्री दीड वाजता पुन्हा उघडण्यात आला.  
6. या प्रकरणी अबकारी कर विभागाचे दोन अधिकारी तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बोबडे आणि सहनिरीक्षक पाटील यांचे निलंबन करण्यात आले.
7. पुणे पोलिसांनी दहा जणांचे रक्तनमुने वेद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा : पुण्यातील स्टिंग ऑपरेशननंतर 'तो' पब सील, 8 जणांविरोधात कारवाई; दोघे निलंबित)

महाराष्ट्रात अंमली पदार्थाचं जाळं कुठेपर्यंत पोहोचलंय? NDTV मराठी