Pune FDA Raid: पुणेकरांनो, आमरस खाताना जरा जपून! 32,000 किलोचा साठा पाहून अधिकारी शॉक, नागरिकांच्या जिवाशी खेळ

Pune FDA Raid Mango Pulp: खेड आणि मावळ तालुक्यात दोन मोठ्या कारवाया केल्या असून यामध्ये तब्बल 32 किलोचा भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केला आहे. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

 Pune FDA Raid:  पुणेकरांनो, उन्हाच्या तडाख्यात तुम्हीही आमरस पुरीचा बेत करताय का? तर आता तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या खेड आणि मावळ तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने पुण्याच्या खेड आणि मावळ तालुक्यात दोन मोठ्या कारवाया केल्या असून यामध्ये तब्बल 32 किलोचा भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केला आहे. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

Pune News: पुण्याचा खरात! अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवले आणि महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त केले; 50 लाखही हडपले

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ! 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आणि मावळ तालुक्यातील उरसे येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 32 हजार किलोचा मँगो पल्प चा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

 एका गोपनीय माहितीच्या आधारे, मावळ तालुक्यातील उरसे येथील 'मे. मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम' या ठिकाणी अन्न व औषध विभागाने धाड टाकली आहे.  या ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय, अनधिकृत रंग आणि इतर पदार्थांचा वापर करून मँगो पल्प तयार केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

या कारवाईत दुध सदृश पदार्थ, मँगो पल्प, कृत्रिम रंग असा एकूण २,२३,१९६/- रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ही संपूर्ण कारवाई सह आयुक्त श्री. दि. वा. भोगावडे आणि आयुक्त श्री. श्रीधर डुबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.

या ठिकाणी मँगो पल्प तयार करताना साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थ, गाईचे दूध आणि केमिकलयुक्त केशरी रंगाचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या या मँगो पल्पमुळे ग्रामीण भागात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र, या भेसळयुक्त पल्पमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

गंभीर आजाराला निमंत्रण...!

जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका तर आहेच, पण दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा देखील धोका व्यक्त केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्वस्त आणि अनोळखी ठिकाणांहून मिळणारा मँगो पल्प खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

(नक्की वाचा: Ulhasnagar News : लाखो रुपये घेतले, घरकाम- स्वयंपाक करवून घेतला; उल्हासनगरमध्ये CBI नोकरीसाठी काय सुरू होतं?)

Topics mentioned in this article