जाहिरात

Bandur Andekar: बंडू आंदेकरची चलाखी.. अर्धवट अर्ज भरुन माघारी फिरला, नेमकं काय घडलं?

मात्र अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि माहिती अपूर्ण असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे. 

Bandur Andekar: बंडू आंदेकरची चलाखी.. अर्धवट अर्ज भरुन माघारी फिरला, नेमकं काय घडलं?

रेवती हिंगवे, पुणे:

Pune Mahanagarpalika Election 2026: पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शनिवारी बंडू आंदेकरसह भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आले होते. यावेळी बंडू आंदेकरने जोरदार घोषणाबाजी करत अर्ज दाखल केला. मात्र अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि माहिती अपूर्ण असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे. 

Maharashtra Politics: महायुतीला मोठा धक्का! राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; जागा वाटपावरुन नाराजी

बंडू आंदेकरने भरला अर्धवट अर्ज

कुख्यात गुंड बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर हे तिघेही कडक पोलीस बंदोबस्तात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाले होते. बंडू आंदेकर याने प्रभाग क्रमांक २४ (कसबा पेठ-कमला नेहरू रुग्णालय) मधून, तर लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनी प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ-नाना पेठ) मधून निवडणूक लढवणार आहेत.

आयुष कोमकर खून प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंडू आंदेकरला विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर तो अर्ज भरण्यासाठी आला होता. यावेळी बंडू आंदेकरने जोरदार घोषणाबाजी केली. नेकी का काम आंदेकर का नाम, वनराज आंदेकर जिंदाबाद असे म्हणत त्याने मोठमोठ्याने घोषणा दिल्या. मात्र ​कार्यालयात आल्यानंतर अर्जांची छाननी करताना अनेक रकाने रिकामे असल्याचे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे समोर आले.

Solapur News : सोलापुरात रक्ताचा सडा! महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवाराची हत्या

पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार..

 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत' अशी भूमिका घेतल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत अद्याप शिल्लक असल्याने, त्रुटी दूर करून हे तिघेही उद्या पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आंदेकरने पुन्हा एकदा बाहेर येण्यासाठी तर ही चलाखी केली नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.  न्यायालयीन कोठडीत असतानाही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या आंदेकरांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com