Pune Fraud: सावधान! इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करताय? पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लुटलं, नेमकं काय घडलं?

सायबर चोरट्यांनी तीन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News:  आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गॅस टंचाई जाणवू लागली आहे. मुंबई, पुण्यामध्ये गॅस टंचाईचा मोठा फटका बसत असून घरगुती गॅसही मिळणे मुश्किल झाले आहे. या गॅस टंचाईच्या अडचणीमुळे अनेकजण इलेक्ट्रिक शेगडी घेत आहेत. अशातच पुण्यामध्ये इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करताना ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

Rupali Chakankar: कॅप्टन खरातची संगत भोवणार! रुपाली चाकणकरांना आणखी एक दणका? मोठी अपडेट समोर

ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गॅस टंचाईची झळ सामान्यांना बसली आहे. गॅस टंचाईमुळे ऑनलाइन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तीन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

पिडीत व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. त्यांनी समाज माध्यमात इलेक्ट्रीक शेगडीची जाहिरात पाहिली होती. गॅस टंचाईमुळे त्यांनी शेगडी खरेदी करण्याचे निश्चित केले.

त्यानंतर त्यांनी जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी शेगडी खरेदीचे पैसे ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागतील, असे त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तीन लाख दहा हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

Ashok Kharat: खळबळजनक खुलासा! कॅप्टन खरातकडे तब्बल 52 सातबारे! तहसीलदार, बडे अधिकारी अडकणार

Topics mentioned in this article