जाहिरात

Ashok Kharat: खळबळजनक खुलासा! कॅप्टन खरातकडे तब्बल 52 सातबारे! तहसीलदार, बडे अधिकारी अडकणार

एसआयटीकडून सुरु असलेल्या चौकशीत - IT भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर तब्बल 52 सातबारा असल्याचं समोर आले आहे. 

Ashok Kharat: खळबळजनक खुलासा! कॅप्टन खरातकडे तब्बल 52 सातबारे! तहसीलदार, बडे अधिकारी अडकणार

Nashik Ashok Kharat Case:  नाशिकमधील अत्याचारी भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरातच्या सेक्स स्कँडल प्रकरणाने राज्यभरात खळबल उडाली आहे. कॅप्टन खरातने शेकडो महिलांवर केलेले अत्याचार, त्याची अफाट संपत्ती आणि राजकीय नेत्यांशी असलेले कनेक्शन उघडकीस आले आहे. अशातच आता अशोक खरात याच्या संपत्तीबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. कॅप्टन अशोक खरातकडे तब्बल 52 सातबारे असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. 

अशोक खरातच्या नावावर 52 सातबारे 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातची शनिवारी एसआयटीकडून तब्बल सात तास कसून चौकशी करण्यात आली. नाशिक पोलीस मुख्यालयातील पोलीस क्लबमध्ये SIT मार्फत कॅप्टन खरातची चौकशी करण्यात आली. एसआयटीकडून सुरु असलेल्या चौकशीत - IT भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर तब्बल 52 सातबारा असल्याचं समोर आले आहे. 

Satara Politics: 'पालकमंत्र्यांचं विनाकारण आकांडतांडव...', मंत्री जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर पलटवार

धक्कादायक बाब म्हणजे काही तहसीलदार तसेच उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचीही सामाईक सातबाऱ्यावर नावे असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. हे अधिकारी सध्या मुंबई, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कार्यरत असल्याची सूत्रांची माहिती आहे.  अनेक नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांसोबत खरात भागीदार असल्याचीही शक्यता असून त्या दिशेनेही SIT चा तपास सुरू आहे. 

आयकर विभागही करणार तपास 

त्याचबरोबर कॅप्टन खरातचे कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे. या  संपूर्ण मालमत्तांबाबत आयकर विभागही तपास करण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या विकृत कृत्यांमुळे हायफाईल भोंदूबाबा अशोक खरातवर आली तोंड लपवण्याची वेळ आली. शनिवारी  SIT चौकशी संपल्यानंतर पोलीस वाहनात खरातने स्वतःला मीडियाच्या कॅमेरापासून लपवले, ज्याचा व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहे. 

भोंदूबाबाचं घृणास्पद कृत्य समोर आणणारा नीरज जाधव कोण? खरात अन् पीडितेचा आणखी एक भयाण कारनामा उघड

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com