GBS Update : पुण्यात जीबीएस रुग्ण शंभरीपार, ही 3 लक्षणं असतील तर दुर्लक्ष करू नका!

Guillain-Barre Syndrome: रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून घेतलेल्या काही जैविक नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळून आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे जिल्ह्यात गुलेन-बॅरे सिंड्रोमची (Pune Guillain-Barre Syndrome) रुग्णसंख्या शंभरीपार गेली आहे. आतापर्यंत पुण्यात याचे 101 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर (Pune GBS) आहे. या आजाराचा उपचार खूप महाग असल्याची माहिती समोर आली होती. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानुसार, पुणे पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. 

जीबीएस कोणत्या वयोगटात अधिक?
जीबीएससारख्या दुर्मीळ मात्र उपचार करण्यायोग्य आजारामुळे 16 रुग्ण सद्यपरिस्थितीत व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय लक्षणं असलेल्या तब्बल 19 रुग्णांचं वयोगट 9 वर्षांपेक्षा कमी आहे. तर 50-80 वयोगटातील 23 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून घेतलेल्या काही जैविक नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळून आले आहेत. सी जेजुनीमुळे गंभीर संक्रमण होण्याची भीती आहे. त्यामुळे पुण्याच्या अधिकाऱ्याकडून पाण्याचे नमुने घेतले जात असून त्याची तपासणी केली जात आहे. 

विहिरीच्या तपासात बॅक्टेरिया ई.कोलीचं प्रमाण अधिक आहे. परीक्षणानुसार पुण्याचं मुख्य जलाशय खडकवासला धरणाजवळील एका विहिरीत बॅक्टेरिया ई.कोलीचं प्रमाण अधिक आढळलं आहे. मात्र या विहिरीतील पाण्याचा वापर करण्यात आला की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र नागरिकांनी पाणी गरम करून पिण्याचा आणि जेवणापूर्वी अन्न गरम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

गुलेन-बॅरे सिंड्रोमचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो?
जीबीएसमध्ये प्राथमिक पातळीवर ताप, खोकला आणि श्वसन घेण्यास त्रास जाणवतो. इतर वेळी बाहेरील विषाणू किंवा बॅक्टेरियावर हल्ला करणारी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात. 

नक्की वाचा - GBS Update : सोलापूरचा तरुण जीबीएसमुळे दगावला, शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर; डॉक्टरांकडून अलर्ट

  1. मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात. 
  2. थकवा जाणवतो.
  3. हातापायाला मुंग्या येतात
  4. पायांपासून याची सुरुवात आणि चेहऱ्यापर्यंत पसरते. 
  5. काहींना पाठदुखीचा त्रास.
  6. स्नायू कमकुवत होतात, हाता-पायांतील त्राण जातो. 
  7. श्वास घ्यायला आणि गिळायला त्रास