पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोमने (Pune Guillain-Barre Syndrome) धुमाकूळ घातला आहे. याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पुणे जिल्ह्यात (Pune News) रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांमुळे पुणेकरही चिंतेत आहेत. दरम्यान या आजारात तातडीने उपचार घेणे आवश्यक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकणात एकाचा (Pune GBS) मृत्यू झाला आहे. हा तरुण मूळचा सोलापूरचा होता. या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
40 वर्षे वय असलेल्या या व्यक्तीस पुण्यात जीबीएसची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होतं असल्याने या रुग्णास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला तरुणाला रुग्णालयात ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने साध्या रूममध्ये रुग्णास हलवण्यात आलं. मात्र अचानकपणे त्याला श्वास घेण्यात अडचण येतं असल्याने पुन्हा एकदा ICU मध्ये भरती करण्यात आलं. उपचारदरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - GBS Patient Death: काळजी घ्या, सतर्क रहा! पुण्यात GBS संशयित रुग्णाचा मृत्यू; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
या रुग्णास पुण्यात जीबीएसची लागण झाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. त्याशिवाय रुग्णाचा व्हिसेरादेखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण आणि प्राथमिक माहिती ही शवविच्छेदन आणि व्हिसेरा तपासणी अहवालानंतरच मिळू शकेल. दरम्यान जीबीएसबाबत कोणीही अफवा पसरवू नये, तसेच लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
त्या रुग्णाच्या शवविच्छेदनात काय आढळलं?
तो रुग्ण चाळीस वर्षाचा होता. खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे पोस्टमार्टमसाठी आणलं होतं. शवविच्छेदन ज्या डॉक्टरांनी केलं त्यांच्या प्राथमिक अहवालानुसार या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाला आहे. पण 100 टक्के खात्री करून घेण्यासाठी मेंदूतील रक्ताचे नमुने, छोटे आणि मोठ्या आतड्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यांच्या तपासणीचे अहवाल 8 दिवसात मिळतील, त्यानंतर नेमकं कारण समोर येईल. या रुग्णाचे दोन्ही हात-पाय निकामी झाले होते. श्वास घ्यायला त्रास होत होता त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मृतदेह पहिल्यानंतर प्राथमिकदृष्टीने तो जीबीएसमुळेच झाल्याचं दिसतय. शिळे अन्न, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. पोटाचा काही त्रास होतं असेल त्यात हातपायचे त्राण गेले असं वाटतं असेल तर डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world