जाहिरात

Lohgad Case: 'लग्न होणार नाही, तरीही...', सियाचे मित्रासोबतचे खळबळजनक चॅट लीक; मोठं सिक्रेट समोर

२३ आणि २४ मे दरम्यान झालेल्या या संभाषणात सियाने तिच्या मैत्रिणीकडे लग्नाच्या बुकिंगचे कारण सांगत तिचे आधार कार्ड मागितले होते.

Lohgad Case: 'लग्न होणार नाही, तरीही...', सियाचे मित्रासोबतचे खळबळजनक चॅट लीक; मोठं सिक्रेट समोर

सुरज कसबे, पुणे:

Ketan Agrawal Murder Case: पुण्यातील उद्योजक पुत्र केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीने अत्यंत निर्घृपणे संपवल्याचे समोर आले आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. केतनच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेल्या सियाचे तिच्या मैत्रिणीसोबतचे चॅटिंग समोर आलं आहे, ज्यामधून या संपूर्ण हत्याकांडाचा आधीच प्लॅन झाला होता का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

लग्न होणारचं नाही; सियाचं धक्कादायक चॅटिंग!

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असून, आता आरोपी सिया गोयल आणि तिच्या मैत्रिणीमधील एक कथित  चॅट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. २३ आणि २४ मे दरम्यान झालेल्या या संभाषणात सियाने तिच्या मैत्रिणीकडे लग्नाच्या बुकिंगचे कारण सांगत तिचे आधार कार्ड मागितले होते.

मात्र मात्र त्याच वेळी लग्न तर होणार नाही, तरी तू आधार कार्ड पाठवून दे असा धक्कादायक मेसेजही तिने केला होता. या वादग्रस्त मेसेजमुळे सिया केतनला संपवण्याचा कट आधीपासूनच रचत होती का, असा बळकट संशय आता निर्माण झाला असून, या कथित चॅटमधील सत्यता किती टक्के आहे आणि त्यामागील खरा हेतू काय होता, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Siya Goyal: तपास यंत्रणांनी काढला हुकमाचा एक्का! सिया एक-एक राज उगळणार, 'ते' 18 प्रश्न केस Solve करणार

पोलिसांचा मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक तपासावर भर

केतन अग्रवाल खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक तपासावर भर दिला. घटनास्थळावरील तपासानंतर अपघाती मृत्यूची शक्यता कमी असल्याचा संशय पोलिसांना आला. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. दोघांच्या उत्तरांतील साम्य आणि विसंगतींमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. 

लोहगडावरील सीसीटीव्हीत हुडी घातलेला तरुण दिसल्यानंतर तपासाला निर्णायक दिशा मिळाली. सीसीटीव्हीतील तरुण चेतन चौधरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मानसशास्त्रीय चौकशीदरम्यान आरोपींच्या वर्तन, हावभाव आणि मानसिक प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. चौकशीतील मानसिक दबावामुळे नियोजनबद्ध हत्येचा कट उघड झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

Siya Goyal: पोलीस कोठडीतही माज! सियाचे अश्लील हावभाव; कॅमेऱ्यासमोर केलं असं कृत्य; संतापजनक VIDEO

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com