जाहिरात

Pune News: लेकानंतर पित्यालाही गमावलं! केतन अग्रवालच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

मुलगा गमावल्याने शोकसागरात बुडालेल्या अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे दुःखद निधन झालं आहे. 

Pune News: लेकानंतर पित्यालाही गमावलं! केतन अग्रवालच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Ketan Agrawal Grandfather Passes Away:  पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. केतन अग्रवाल याची लोहगडावरुन ढकलून देत त्याच्या होणाऱ्या पत्नीकडूनच निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. घरातील तरुण मुलगा गमावल्याने शोकसागरात बुडालेल्या अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे दुःखद निधन झालं आहे. 

Mumbai Rain: मुंबईकरांनो घरीच थांबा! आज अतिवृष्टीचा इशारा; BMCकडूनही आवाहन, वाचा हवामान अंदाज

केतनच्या मृत्यूनंतर दुसरा धक्का, अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

राज्यभर चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद  अग्रवाल यांचे दुःखद निधन झाले आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडियावर मिस यू डॅड अशी भावुक पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. नातवाच्या क्रुर हत्येचा धक्का सहन न झाल्याने ज्योतीचंद यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगण्यात येत आहे. 

केतनचे आजोबा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. केतनच्या हत्येनंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं दुःख व्यक्त केले होते. अत्यंत क्रुरपणे नातवाला संपवल्याचं दुःख व्यक्त करत दोषींना फाशी देण्याची मागणीही त्यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच केतनच्या हत्येनंतर निघालेल्या कँडल मार्चमध्येही ते सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना रुग्णालयात आणले, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

Siya Goyal: सिया गोयलचे 'ते' अश्लील कृत्य! त्यात ही आता नवा वाद, वडिलांनी केला भलताच दावा

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com