जाहिरात

Pune liquor Case: अवैध दारु विक्रेत्यांची खैर नाही, पुण्यातील दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट; विधानसभेत मोठी घोषणा

तपासात १७ आरोपी निष्पन्न झाले आहेत. सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.

Pune liquor Case: अवैध दारु विक्रेत्यांची खैर नाही, पुण्यातील दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट; विधानसभेत मोठी घोषणा

  Pune Toxic Liquor Case Update: पुण्यातील मिथेनॉलयुक्त गावठी दारू प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. तसेच अवैध मद्यनिर्मिती व अमली पदार्थांविरोधात राज्यभर विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. विधान परिषदेत पुणे येथील विषारी दारू दुर्घटनेबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यास उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दापोडी पोलीस ठाणे हद्दीतील संजयनगर, फुगेवाडी तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हडपसर पोलीस ठाणे हद्दीत मिथेनॉलयुक्त गावठी दारूचे सेवन केल्याने एकूण २२ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोडी व हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासात १७ आरोपी निष्पन्न झाले आहेत. सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.

Rain News: तुफान पाऊस बरसणार! मुंबईसह 4 जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे कुठे शाळांना सुट्टी? हेल्पलाईन क्रमांक जारी

दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आणि पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात आली. २८ मे ते ३० जून २०२६ या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात ४,४५७ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ३,३४१ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे १०.९८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमली पदार्थांविरोधात शासनाने 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबले असून तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कठोर कारवाई सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने करमाड परिसरात कारवाई करून ९ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह वाहन असा एकूण १०.५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.

नक्की वाचा - Jalgaon News: दीड कोटींची रोकड, अर्धा किलो सोनं, मुद्रांक अधिकाऱ्याच्या घरात घबाड, बडा अधिकारी वाईट फसला 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com