जाहिरात

Pune Crime: गर्भश्रीमंत केतनशी लग्न का करायचं नव्हतं? चार दिवसानंतर सियाने तोंड उघडलं, 'त्या' 2 गोष्टी खटकल्या

केतन अग्रवालच्या हप्तेचा तपास आणि खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. 

Pune Crime: गर्भश्रीमंत केतनशी लग्न का करायचं नव्हतं? चार दिवसानंतर सियाने तोंड उघडलं, 'त्या' 2 गोष्टी खटकल्या

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Pune Ketan Agarwal Murder Case: अवघ्या देशाला हादरवणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयलनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने हे क्रुर हत्याकांड केल्याचं स्पष्ट झालं आहे. सियाचे चेतन चौधरीशी प्रेमसंबंध असल्याने हे लग्न मान्य नव्हतं त्यामुळेच दोघांनी मिळून केतनचा काटा काढल्याचे सांगण्यात येत होते. आता या प्रकरणात आणखी एक मोठा ट्वीस्ट आला असून चेतनच्या हत्येचे आणखी एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. 

MSRTC News: पर्यटकांसाठी खुशखबर! फक्त 110 रुपयात महाबळेश्वर सफर; 'लालपरी'ची भन्नाट ऑफर काय?

केतनच्या दोन गोष्टी खटकल्या, हत्येचं खर कारण समोर

समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी सध्या तुरुंगात आहेत. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी होत असून नवनवे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या तपासात सियाने केतनच्या दोन गोष्टी तिला खटकत असल्याचा मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी भेट घेतली. केतन अग्रवालच्या हप्तेचा तपास आणि खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. 

"काही मेडिकल कारणांमुळे केतनला केसांचा छोटासा पॅच होता, मात्र हे सिया आणि तिच्या कुटुंबाला माहिती होते. याबाबत लग्न ठरवण्याच्या अगोदर क्लिअर सांगितलं होते, असं विशाल अग्रवाल म्हणाले. तसेच तिला मान्य नव्हतं तर नकार देणे तिच्यासाठी सोपे होते, यासाठी हत्या करण्याचे काहीच कारण नव्हते. माझ्या मुलाला मारण्याचे कारण काय?" असा संपत्त सवाल त्यांनी केला. 

"प्लॅनिंगमध्ये आणखी लोकांचा समावेश"

त्याचबरोबर "चेतन आणि सियाचा भाऊ साहिल हे दोघे मित्र आहेत, त्यामुळे त्यालाही त्यांच्या अफेयरबाबत माहिती असावी. तसेच केतनच्या हत्येच्या  प्लॅनिंगमध्ये आणखी लोक सहभागी असतील, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, ही केस फास्टट्रॅकमध्ये चालवावी तसेच लवकरात लवकर जे सत्य आहे ते बाहेर यावे तसेच जे आरोपी आहे त्याला आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे तसेच मी स्वतः लक्ष देणार असं आश्वासन दिल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. 

Tukaram Munde: ​अन्नसुरक्षेचा 'मुंडे पॅटर्न'! फक्त 30 दिवसात 900 धाडी, 457 जण अटकेत; 42 वाहन जप्त

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com