जाहिरात

Tukaram Munde: ​अन्नसुरक्षेचा 'मुंडे पॅटर्न'! फक्त 30 दिवसात 900 धाडी, 457 जण अटकेत; 42 वाहन जप्त

जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापना सील करून ४५७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ४२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा 'मुंडे पॅटर्न' आगामी काळात किती प्रभावी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Tukaram Munde: ​अन्नसुरक्षेचा 'मुंडे पॅटर्न'! फक्त 30 दिवसात 900 धाडी, 457 जण अटकेत; 42 वाहन जप्त

ऋतिक गणकवार, मुंबई:

FDA Tukaram Munde News:  अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आपल्या शिस्तबद्ध कार्यशैलीचा परिचय देत राज्यभरात धडाकेबाज मोहिमांना सुरुवात केली आहे. मागील ३० दिवसांच्या कालावधीत विभागाने ९०४ ठिकाणी धाडी टाकून ३४ कोटी ६६ लाख ९० हजार ६२४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा माफियांवर आता ‘मकोका' (MCOCA) लावण्याचे संकेत देत प्रशासनाने या अवैध धंद्यांवर वचक निर्माण केला आहे.

Stamp Duty Scam: 13.91 कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी घोटाळा उघडकीस, महसूल मंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय

तुकाराम मुंडेंचा धडाका, राज्यभरात कारवाई

​केवळ गुटखाच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांवरही मुंढे यांनी कडक भूमिका घेतली आहे. आता राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छ व मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकांना सक्तीने मिनरल वॉटर विकण्याचा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही. तसेच, रुग्णालयांनी रुग्णांना स्वतःच्याच संलग्न मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. रुग्ण कोणत्याही परवानाधारक दुकानातून औषधे घेण्यास स्वतंत्र असतील.

​दुग्धजन्य पदार्थ, मावा आणि खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स आणि नामांकित ब्रँड्सनाही अन्नसुरक्षा नियमांच्या चौकटीत आणले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईकरांच्या लाडक्या इडली-डोशाच्या गुणवत्तेवरही आता एफडीएची नजर राहणार आहे. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापना सील करून ४५७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ४२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा 'मुंडे पॅटर्न' आगामी काळात किती प्रभावी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Raj Thackeray: कार्पेट टाका, पांढऱ्या पट्ट्या कशाला? राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाला झापलं; कडक शब्दात इशारा

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com