Pune Election 2026: पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचा वाद! शिंदे गटाकडून स्वबळाची तयारी?

भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शिंदे गट स्वबळावर लढणार असल्याचा इशाराही निलम गोऱ्हेंनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Election 2026 BJP Shivsena Seat Sharing:  पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. भाजपने शिवसेनेला फक्त १६ जागांची ॲाफर दिली आहे. तर ३५ जागा देण्याची मागणी शिंदे गट करत आहे. भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शिंदे गट स्वबळावर लढणार असल्याचा इशाराही निलम गोऱ्हेंनी दिला आहे.

भाजपकडून शिवसेनेला फक्त १६ जागांची ऑफर...

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. भाजपने देऊ केलेली अवघ्या 16 जागांची ऑफर शिंदे गटाने फेटाळून लावली आहे. सन्मानजनक जागा न मिळाल्यास पुण्यात स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे. 60 जागेवर आज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दोन्ही 'राष्ट्रवादी' एकत्र? अजित पवारांची अमोल कोल्हे रोहित पवारांसोबत खलबतं; पिंपरी-चिंचवडसाठी नवा प्लॅन

शिंदे गट स्वबळावर लढणार...! 

​पुणे हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2017 च्या निवडणुकीतील संख्याबळाचा आधार घेत भाजपने बहुतांश जागांवर आपला दावा कायम ठेवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने शिवसेनेला केवळ १६ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेने किमान 35 जागांची मागणी लावून धरली आहे. "पक्षाची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ३५ जागांची आमची मागणी रास्त आहे," असे मत शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे. 

दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पुण्यासह राज्यातही मनोमिलन होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून पुणे तसंच पिंपरी चिंचवडचा फॉर्म्युला राज्यातही राबवला जाणार असल्याची चर्चा आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसंच राज्याच्या उर्वरित भागात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचं ठरल्यास निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Advertisement

Dombivli News : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत निवडणुकीची रणधुमाळी थांबणार? उमेदवारांना थेट इशारा