Tourist Place: पावसाळ्यात फिरायचा प्लॅन करताय? पुण्याजवळील 'ही' पर्यटनस्थळं राहणार बंद

पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्यात उतरणे, वाहतूक कोंडी, सार्वजनिक शांततेचा भंग आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maval Tourist Closed:  मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पावसामुळे परिसरातील धबधबे प्रवाहित झाले असून पर्यटक मोठी गर्दी आहेत. अशातच पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी पाहता दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातीलमावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ लागू करण्यात आले आहे. हा आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

Advertisement

Political News: "गद्दारांना प्रतिष्ठा का देताय?", शिंदे-पवार भेटीवर संजय राऊत रोखठोक बोलले

या आदेशानुसार मावळ तालुक्यातील मौजे लोणावळा परिसरातील भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट , शिवलिंग पाईन्ट, एकविरा देवी कार्ला लेणी तसेच पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू करण्यात आली आहेत. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्यात उतरणे, वाहतूक कोंडी, सार्वजनिक शांततेचा भंग आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.

प्रशासनाने पर्यटकांना आदेशातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले असून, धोकादायक कडे, धबधबे आणि पाणीसाठ्यांच्या परिसरात सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नक्की वाचा-  Marathwada News: जमिनीतून मोठा गूढ आवाज अन् हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ)