जाहिरात

Pune News : जमीन मोजणीचा भलताच 'मुळशी पॅटर्न'... शेतकऱ्यावर वडिलोपार्जित घर गमावण्याची वेळ

राज्यभरात अनेक गावात शेतकऱ्यांची भांडणं ही केवळ भूमी अभिलेख खात्याच्या गलथान कारभारामुळे उभी रहात असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

Pune News : जमीन मोजणीचा भलताच 'मुळशी पॅटर्न'... शेतकऱ्यावर वडिलोपार्जित घर गमावण्याची वेळ
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनीधी

राज्यभरात अनेक गावात शेतकऱ्यांची भांडणं ही केवळ भूमी अभिलेख खात्याच्या गलथान कारभारामुळे उभी रहात असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. जमीन मोजणी चुकीची झाल्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. या चुकीच्या मोजणीमुळे त्यांना राहते घर गमावण्याची वेळ आलीय. अथवा कोर्टात वेळ आणि पैसा घालवून मनस्ताप सहन करावा लागतो. पुणे जिल्ह्याच्या मुळशीमधील पिरंगुट गावातील अरुण राऊत यांना असाच अनुभव आला आहे. ते या प्रकरणात एक-दोनदा नाही तर तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांना न्याय तर मिळालेला नाहीच उलट वडिलोपार्जित घर गमावण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

मुळशी मधील लवळे गावच्या हद्दीत असणाऱ्या राऊतवाडी येथे गट नंबर 413 मध्ये अरुण राऊत यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्याच गटात त्यांचे घर देखील आहे. गट नंबर 413 आणि गट नंबर 430 या गटाचा बांध हा पुर्व पश्चिम दिशेला सरळ आहे. त्याची नोंद ही शासकीय दफ्तरी नकाशात तशी नमूद आहे. 2006 साली झालेल्या कोर्ट कमिशनर मोजणीतही हद्द आणि खुणा या कायम आहेत. मात्र मोजणी कार्यालय मुळशी हे गट नबंर 413 आणि गट नंबर 430 चा बांध हा नकाशात सरळ असतानाही तिरकस दाखवत आहेत.

कोर्ट कमिशनर यांनी मोजणी झालेली असतानाच तसेच मोजणी कार्यालयाच्या मूळ रेकार्डकडे दुर्लक्ष केले. लगतधारक शेतकरी आणि मोजणी कार्यालयाच्या संगनमताने गटाची हद्द चुकीची दाखवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

( नक्की वाचा : Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार )

मोजणी कार्यालय मुळशीच्या  कारभारामुळे गट नंबर 413 मधील चाळीस वर्षांपूर्वीचे घर हे हे शेजारील गट नंबर 430 मध्ये दाखवत आहे. लगतधारक आणि मोजणी कार्यालयातील भूकरमापक तसेच अधिकाऱ्याच्या संगनमतामुळे हा प्रकार घडला आहेय शासकीय दफ्तर हे रेकार्ड डावलून चुकीच्या मोजणीच्या हद्दी खुणा दाखवण्याचे काम मोजणी कार्यालय करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

मुळशीतील मोजणी कार्यालयाच्या चुकीच्या कार्यपध्दतीवर शेतकऱ्याने आक्षेप घेत तक्रारी केल्या आहेत. तसेच उपोषणाचा इशारा देऊन  यापूर्वी दोनदा उपोषण केले आहे आता पुन्हा आमरण उपोषण ते करणार आहेत.. पुण्यातील महानगर पालिका हद्दीत असेच काही गैरप्रकार केलेल्या अधिकाऱ्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे आता या प्रकरणातील राज्यभरातील शेतकऱ्यांना ते न्याय देतील का?  याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com