Pune Municiple Corporation Election News: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. पुण्यात भाजपने 119 अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 27, ठाकरे गटाने 1 तर काँग्रेसने 14 जागा जिंकल्या. पुण्यामध्ये आप आणि मनसेला भोपळाही फोडता आला नाही. विशेष म्हणजे आप मनसेपेक्षा पुणेकरांनी नोटाला जास्त मत दिल्याचं समोर आले आहे.
पुणेकरांची नोटाला पसंती
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका (पीएमसी) निवडणुकांमध्ये ‘वरीलपैकी कोणीही नाही' (NOTA) या पर्यायाला दोन लाखांहून अधिक मतदारांनी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे ‘नोटा'ला मिळालेल्या मतांची संख्या आम आदमी पार्टी (आप) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्याही पुढे आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुणे महानगरपालिका निवडणुकीत एकूण 74 लाख 63 हजार 824 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी तब्बल 2 लाख 21 हजार 209 मतदारांनी ‘नोटा'चा पर्याय निवडला असून, हे एकूण मतदानाच्या जवळपास 3 टक्के आहे. ‘नोटा'ला मिळालेल्या मतांनी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी तसेच अपक्ष उमेदवारांनी मिळवलेल्या मतांनाही मागे टाकले आहे.
मनसे, आपपेक्षा जास्त मते
पुणे महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या आम आदमी पार्टीला 50 हजार 517 मते मिळाली, तर मनसेला 1 लाख 55 हजार 788 मते मिळाली. रम्यान, अनेक राजकीय पक्षांतील बंडखोर उमेदवारांचा समावेश असलेल्या अपक्ष उमेदवारांना एकत्रितपणे 1 लाख 47 हजार 278 मते मिळाली. एकूण 1,155 उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. ‘नोटा'ला मिळालेल्या मोठ्या प्रमाणावरील मतांमुळे मतदारांमधील असंतोष आणि विद्यमान राजकीय पर्यायांविषयीची नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Mumbai News: मुंबईतील गोड आठवण इतिहासजमा! 112 वर्ष जुने 'हे' इराणी रेस्टॉरंट कायमचे बंद