Pune Nashik Accident Update: पुणे- नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज (शुक्रवार, ता. 17 जानेवारी) सकाळी पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झालेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. सुरुवातीला प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही धडक इतकी जोरदार होती की चेंडूप्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेल्या बसवर आदळली. या भयंकर अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही भिती वर्तवली जात आहे.
अपघातातील मृतांची नावे:
1. देबुबाई दामू टाकळकर (वय 65 वर्ष, रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे)
2. विनोद केरूभाऊ रोकडे वय50 वर्ष, रा. कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे)
3. युवराज महादेव वाव्हळ (वय 23 वर्ष, रा. 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे)
4. चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय 57 वर्ष, रा. कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे,)
5. गीता बाबुराव गवारे (वय 45 वर्षे, कांदळी ता, जुन्नर जि. पुणे)
6. भाऊ रभाजी बडे (वय 65 वर्ष, रा. नगदवाडी कांदळी, ता. जुन्नर जिल्हा पुणे)
7. नजमा अहमद हनीफ शेख (वय 35 वर्ष, रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर)
8. वशिफा वशिम इनामदार (वय 5 वर्ष)
9. मनीषा नानासाहेब पाचरणे (वय 56 वर्षे, रा.14 नंबर तालुका जुन्नर, जिल्हा पुणे)
(नक्की वाचा- Baramati Crime : अंत्यविधीची तयारी थांबली, 9 वर्षांच्या पीयुषच्या शवविच्छेदनानंतर बापाचं घृणास्पद कृत्य समोर )
सरकारकडून पाच लाखांची मदत:
दरम्यान, या अपघातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत जाहीर केली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे पुणे पोलिस अधीक्षकांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world