Pune Navale Bridge Accident Speed Limit Rules: पुण्यातील नवले पुलावर घडलेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी वारंवार अपघात होत असून नवले पूल मृत्यूचा सापळा ठरत आहे. मागील आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर आता प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. मुंबई- बंगळुरु महामार्गावर असलेल्या या उतारावर आता वाहनांची वेगमर्यादा नव्याने निश्चित करण्यात आली आहे.
काय आहे नवीन वेगमर्यादा
समोर आलेल्या माहितीनुसार, नवले पूलावरील भीषण अपघातानंतर प्रशासनाने वाहनांच्या वेगमर्यादेबाबत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. नवले पूल परिसरात वाहनांची वेगमर्यादा 60 किलोमीटर वरुन 30 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. वाहनांच्या वेगावर स्पीडगनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर वारंवार अपघात का होतात?
त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांनी अवजड वाहनांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे अवजड वाहनांमध्ये असणारा लोड खेड- शिवापूर टोलनाक्यावर चेक केला जाईल. जो जास्त असेल तर दंडही आकारला जाईल आणि लोड कमी केला जाईल. यासाठी स्पीडगनही लावण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठ्या दंडाची कारवाई होणार आहे. पुढच्याच टोलनाक्यावर हा दंड लगेच वसूल केला जाईल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी चेक पोस्ट उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या चेकपोस्टवर वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या सामानाची वाहतूक होतेय का याची तपासणी होणार आहे. तसेचचालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक 100 मीटरवर सूचना फलक लावण्यात येणार आहे.
Car Break Failure: अचानक गाडीचा ब्रेक फेल झाल्यास काय कराल? ड्रायव्हरला 'हे' माहित असायलाच हवं!
या उपाययोजना केल्या जाणार!
- वाहनांची वेगमर्यादा प्रतितास 60 ऐवजी 30 किमी करावी.
- रस्त्यावरील सूचना फलक, दिशादर्शकांची संख्या वाढवावी.
- स्पीड गन्सची संख्या तीनऐवजी सहा करावी.
- पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारावेत.
- यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील अतिक्रमणे हटवावीत.