Pune News: चिंता वाढली! पुण्यात GBS चा आणखी एक बळी; 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू

 पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या 36 वर्षीय युवकाला 21 जानेवारी रोजी  गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे: पुणे शहरात सध्या जीबीएस म्हणजेच गुईलेन बॅरे सिंड्रोमने नागरिकांचे टेन्शन वाढवले आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. अशातच आता जीबीएसमुळे 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकरांची चिता आणखी वाढली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या 36 वर्षीय युवकाला 21 जानेवारी रोजी  गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. या रूग्णाला गुईलेन बॅरे सिंड्रोम नंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती.

नक्की वाचा - GBS Update : पुण्यात जीबीएस रुग्ण शंभरीपार, ही 3 लक्षणं असतील तर दुर्लक्ष करू नका!

उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला? उपचारात हयगय झाली का? याची चौकशी करण्यासाठी वायसीएमने समिती स्थापन केली होती.

या रुग्णाला  गुईलेन बॅरे सिंड्रोमनंतर या रुग्णाला न्यूमोनियाही झाला होता. न्यूमोनियामुळे श्वसनसंस्थेवर आघात झाला. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने  आणि गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने मृत्यू झाल्याची कारणे समितीने दिली आहेत. याआधी 25 जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या पिंपरीतील एका ६७ वर्षीय महिलेचा न्यूमोनिया, श्वसनक्रिया बंद पडणे, रक्तात संसर्ग पसरल्याने मृत्यू झाला होता.

Advertisement

नक्की वाचा - Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता...

या महिलेवर अडीच महिन्यांपासून उपचार सुरू होते. 'जीबीएस'मुळे मृत्यू झाला नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला होता. शहरात आजपर्यंत 13 रुग्ण गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे आढळले होते. त्यापैकी काही रुग्ण बरे झाले आहेत. तर, काहींवर उपचार सुरू आहेत.