![Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता... Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता...](https://c.ndtvimg.com/2025-01/pnu11egg_crime_625x300_28_January_25.jpeg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना नांदेडच्या तुळशीरामनगर इथं घडली होती. लग्नाला पाचच वर्ष झाली होती. एक लहान मुलगाही तिला होता. अशा वेळी तिने अचानक आत्महत्या करणं तिच्या माहेरच्यांना खटकलं. ज्यावेळी त्यांनी याबाबत अधिक माहित समोर आणली त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. आता तर तिच्या मृतदेहाचे पुन्हा एकदा इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. यातून अनेक गोष्टी समोर येतील असं बोललं जात आहे.या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रियंका अन्नपुरे ही 32 वर्षाची विवाहीत तरूणी नांदेड इथं राहात होती. तिचं 2000 साली अभिजीत अन्नपुरे याच्या बरोबर लग्न झाले होते. हे दोघे आपल्या कुटुंबासह नांदेडच्या तुळशीरामनगर इथं राहात होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच प्रियंकाला सोन्याचे दागिने आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यासाठी तिचा छळही केला जात होता. याबाबत तिने आपल्या आई वडीलांना माहिती ही दिली होती. महिला सहाय्यता केंद्रापर्यंतही हे प्रकरण गेले होते.
पुढे 2022 मध्ये प्रियंकाला मुलगा झाला. त्यामुळे पुढे आता सर्व काही ठिक होईल असं तिच्या आई वडीलांना वाटत होतं. पण तसं काहीच झालं नाही. तिचा झळ सुरूच होता. शेवटी तिने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तिने नांदेडच्या राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली. मात्र ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असा आरोप प्रियंकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याबाबतची तक्रारही त्यांनी नांदेड पोलिसांना दिली आहे.
आपल्या मुलीचा मृत्यू हा संशयास्पद आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे तिचं पुन्हा एकदा शवविच्छेदन केलं जावं. शिवाय हे शवविच्छेदन इन कॅमेरा व्हावं अशी मागणी ही त्यांनी केली आहे. हुंड्यासाठी छळ करून मुलीची हत्या केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीसांनी प्रियांकाचा नवरा ,सासू , सासरे आणि नंदन अश्या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय तिघांना अटक ही करण्यात आली आहे.
प्रियंकाच्या आत्महत्येनंतर तिच्या घरचे येण्या आधीच तिचे शवविच्छेदन करण्यात आले होते. असं तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शिवाय तिच्या अंगावर मारहाणीच्या खूणा होत्या असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच पुन्हा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी प्रियंकाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी आणि अधिष्ठातांशी चर्चा करून, पुन्हा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world