Pune News : PMP च्या तिकीट दरात वाढ मात्र सेवेकडे दुर्लक्ष; जूनमध्ये ब्रेक डाऊनच्या घटनेत मोठी वाढ

ब्रेकडाऊन झाल्यानंतर ठेकेदारांना दंड आकारण्यापेक्षा बसची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होते का हे पाहणे गरजेचे आहे. पण पीएमपीचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीने (Pune PMP) एक जूनपासून तिकिटाच्या दरात वाढ (Pune PMP ticket price hike) केली. मात्र, सेवेचा दर्जा सुधारण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं समोर आलं आहे. जून महिन्यात बस ब्रेक डाऊन (बसमध्ये तांत्रिक किंवा इतर काही कारणांमुळे बंद पडणे) होण्याच्या 2400 घटना घडल्या आहेत. पीएमपीच्या बसेस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमपीआरडीए मार्गावर बस सोडण्यात येतात. 

गेल्या दोन महिन्यांत ब्रेकडाउन झालेल्या बसमध्ये 70 टक्के बस या ठेकेदारांच्या असल्याचे उघडकीस आले आहे. मे महिन्यात ठेकेदारांच्या बस ब्रेक डाउन होण्याच्या 1400 घटना घडल्या. जूनमध्ये हाच आकडा 1695 होता. हा आकडा मे महिन्यापेक्षाही जास्त आहे. या दोन महिन्यांत मिळून पीएमपीच्या स्वमालकीच्या बस ब्रेक डाउन होण्याच्या 1274 घटना घडल्या. त्यामुळे ठेकेदारांच्या बससेवेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

नक्की वाचा - Pune Mumbai Shivneri driver : पुणे-मुंबई शिवनेरीच्या प्रवाशांचा जीव धोक्यात; दारूचे घोट घेत घेत चालवली बस...

ब्रेकडाऊन झाल्यानंतर ठेकेदारांना दंड आकारण्यापेक्षा बसची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होते का हे पाहणे गरजेचे आहे. पण पीएमपीचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. प्रवाशांना उशीर होतो शिवाय आर्थिक फटकादेखील बसतो. त्यामुळे तिकीट वाढवले तरी सेवा काही सुधारली नसल्याचे दिसत आहे.

Advertisement

ब्रेक डाउनसंदर्भातील आकडेवारी

महिना  स्वमालकी बस      ठेकेदार बस
मे           561                    1400
जून        713                    1695

Topics mentioned in this article