जाहिरात

Pune Mumbai Shivneri driver : पुणे-मुंबई शिवनेरीच्या प्रवाशांचा जीव धोक्यात; दारूचे घोट घेत घेत चालवली बस...

स्वारगेट ते ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या शिवनेरी बसवरील चालक हा स्वारगेट येथे असताना दारू पिताना प्रवाशांनी पाहिलं. पण, तो काही तरी वेगळेच पित असावा असा समज करून प्रवाशी शांत बसले.

Pune Mumbai Shivneri driver : पुणे-मुंबई शिवनेरीच्या प्रवाशांचा जीव धोक्यात; दारूचे घोट घेत घेत चालवली बस...

पुण्यातून मुंबईच्या (Pune to Mumbai Shivneri Bus driver) दिशेने जाणाऱ्या शिवनेरीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नियमाप्रमाणे दारू पिऊन गाडी चालवणं हा गुन्हा मानला जातो. यातून आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत आणि बऱ्याच जणांचा जीव गमवावा लागला आहे. असं असतानाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) चालकच दारू पिऊन गाडी चालवित असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शिवनेरीचा बस चालक स्प्राईटच्या बाटलीचे (Shivneri Bus driver drunk) घोट घेत घेत बस चालवित होता. सुरुवातील तो कोल्डिंग पित असल्याचं प्रवाशांना वाटलं. काही वेळानंतर तो दारू पित असल्याचं लक्षात येताच शिवनेरीच्या मद्यधुंद चालकाला प्रवाशांनी रंगेहाथ पकडलं. ही घटना 11 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता घडली आहे.

Mumbai-Pune Railway Route: मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प, वाचा कोणत्या एक्स्प्रेसवर झाला परिणाम?

नक्की वाचा - Mumbai-Pune Railway Route: मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प, वाचा कोणत्या एक्स्प्रेसवर झाला परिणाम?

स्वारगेट ते ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या शिवनेरी बसवरील चालक हा स्वारगेट येथे असताना दारू पिताना प्रवाशांनी पाहिलं. पण, तो काही तरी वेगळेच पित असावा असा समज करून प्रवाशी शांत बसले. त्यानंतर स्वारगेट स्थानकडून बस ठाण्याच्या दिशेने निघाली असता पुन्हा चालकाने दारू पिण्यास सुरुवात केली. त्याने स्प्राईटच्या बाटलीत दारू मिक्स केली होती. त्यावेळी नळ स्टॉप परिसरात चालकाला दारू पिताना रंगेहाथ पकडण्यात आले. नळ स्टॉप चौकात प्रवाशांनी बस थांबवली आणि पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी तत्काळ बस चालकाला ताब्यात घेतलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com