पुणे: महाराष्ट्रातील आपत्कालीन रुग्णसेवा (ॲम्बुलन्स) खरेदीमध्ये झालेल्या कथित 637 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अमित साळुंखे याला झारखंडमधील 450 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याप्रकरणी रांची येथे अटक करण्यात आली आहे. साळुंखे याला यापूर्वी छत्तीसगडमध्येही दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी विजय कुंभार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 900 ॲम्बुलन्स 637 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, टेंडर कोणाला मिळावे यावरून अंतर्गत वाद आणि राजकारण झाले, ज्यामुळे हा मोठा घोटाळा झाला. अमित साळुंखे आणि त्याचा भाऊ सुमित साळुंखे यांनी यापूर्वीही अनेक घोटाळे केल्याचे समोर आले आहे. यामध्ये स्वच्छता टेंडर, पुण्यातील कचरा टेंडर आणि उल्हासनगर टेंडर यांसारख्या प्रकरणांचा समावेश आहे.
Mumbai News: परप्रांतीयाने बांधले फुटपाथवर दुकान, वीजही मिळाली; महापालिका अधिकारी अडचणीत
ॲम्बुलन्स खरेदीसाठी सुरुवातीला 637 कोटी रुपये अपेक्षित होते, परंतु नंतर हा खर्च 6000 कोटी रुपयांपर्यंत वाढला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीला पाच वर्षांत 30,000 कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. साळुंखे यांना टेंडर मिळवण्यासाठी राजकीय लॉबिंग करण्यात आले होते आणि ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते असेही म्हटले जाते. सध्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतानाही नव्या ॲम्बुलन्स खरेदीबाबत काहीही झालेले नाही आणि जुन्याच ॲम्बुलन्स वापरल्या जात आहेत. अमित साळुंखेच्या अटकेमुळे महाराष्ट्रातील ॲम्बुलन्स घोटाळ्याच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याप्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये एकीकडं बिल थकलं म्हणून एक तरुण कंत्राटदार आत्महत्या करतो तर दुसरीकडं सरकार एका लाडक्या मित्रासाठी सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून ॲम्ब्युलन्स खरेदीतून ६ हजार कोटींचा फायदा करून देतात. हा कुणाचा मित्र आणि त्याला पाठीशी कोण घालतंय याची चौकशी सरकार करणार का? की घोटाळेबाज मित्राला व पाठीराख्याला अजून घोटाळे करण्यासाठी मोकळं सोडणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Ajit Pawar News: 'आपलं वाटोळं झालं, IT पार्क चाललं..', पहाटे पहाटे अजित पवार कुणावर संतापले?