Mahashivratri 2026: भाविकांसाठी महत्त्वाचं! महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर खुलं राहणार का? जाणून घ्या

मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य व यंत्रसामग्री ठेवलेली आहे. भाविकांची मोठी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 अविनाश पवार, पुणे:

Jyotirlinga Sri Kshetra Bhimashankar Temple Closed On Mahashivratri:  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदाची महाशिवरात्री शिवभक्तांविना साजरी होणार आहे. भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद रहाणार असुन महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर सुरु ठेवण्यात येणार होते, मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी महाशिवरात्री काळात म्हणजेच १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. 

भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला बंद

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या भव्य सभामंडप, पायरी मार्ग आणि परिसर विकासाच्या कामांना युद्धपातळीवर गती देण्यात आली असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य व यंत्रसामग्री ठेवलेली आहे. भाविकांची मोठी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनी लक्ष द्या! पाणीपुरवठा बंद राहणार, कधी अन् कोणत्या भागात? वाचा..

 9 जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. सुरुवातीला महाशिवरात्रीला मंदिर सुरु ठेवणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले होते, मात्र आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीचा पाच दिवसीय उत्सव यंदाही पार पडणार असला तरी यावेळी भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराचे सर्व धार्मिक विधी आणि पूजा कार्यक्रम मात्र नियमितपणे पार पडणार आहेत.

भीमाशंकरच्या विकासासाठी सरकारने एकूण 288.17 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यांतर्गत अनेक सोई सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दर्शन रांगेचे नियोजन, पिण्याचे पाणी आणि निवासाची सोय, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता दुरुस्तीची कामे, रस्ते, पार्किंग आणि परिसरातील स्वच्छता व्यवस्था आदींचा समावेश आहे. 

Mobile Apps: मुंबईत जगणं सोपं करतील हे 7 अ‍ॅप्स; वेळ तर 100 टक्के वाचेल