जाहिरात

Mobile Apps: मुंबईत जगणं सोपं करतील हे 7 अ‍ॅप्स; वेळ तर 100 टक्के वाचेल

Mobile Apps for Mumbaikars: मुंबईची लोकल कधी येईल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल आणि आज मेगाब्लॉक आहे का? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे m-Indicator.

Mobile Apps: मुंबईत जगणं सोपं करतील हे 7 अ‍ॅप्स; वेळ तर 100 टक्के वाचेल

Mobile Apps for Mumbaikars: जगातील सर्वात वेगवान शहरांपैकी एक असलेल्या मुंबईत वेळ वाचवणे म्हणजे पैसे वाचवण्यासारखेच आहे. लोकल ट्रेनची गर्दी असो किंवा रस्त्यावरील ट्रॅफिक, या समस्यांवर उपाय म्हणून काही सरकारी आणि खाजगी अ‍ॅप्स मुंबईकरांच्या सेवेत आहेत. या महत्त्वाच्या अ‍ॅप्सबद्दलचा सविस्तर माहिती घेऊयात.

m-Indicator: लोकल ट्रेनसाठी

मुंबईची लोकल कधी येईल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल आणि आज मेगाब्लॉक आहे का? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे m-Indicator. यात आता रस्ते वाहतूक आणि रिक्षा-टॅक्सीच्या सुधारित भाडेपत्रकाचीही माहिती मिळते.

Chalo App: बेस्ट बसचा लाईव्ह ट्रॅकर

बस स्टॉपवर तासनतास उभे राहण्याचे दिवस आता संपले आहेत. 'चलो अ‍ॅप'मुळे तुमची बस नक्की कुठे आहे हे नकाशावर पाहता येते. तसेच मोबाईलवरूनच बसचे डिजिटल तिकीट काढता येत असल्याने सुट्ट्या पैशांचे टेन्शन राहत नाही.

(नक्की वाचा- BMC Mayor: मुंबई महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार? ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट, "आम्ही सक्षम...')

UTS on Mobile: तिकीट खिडकीच्या रांगेला निरोप

लोकलचे तिकीट काढण्यासाठी खिडकीवर रांगेत उभे राहण्यापेक्षा 'UTS' अ‍ॅप वापरणे कधीही उत्तम. याद्वारे तुम्ही घरबसल्या किंवा स्टेशनच्या परिसरातून तिकीट आणि सिझन पास (पास) बुक करू शकता.

Mumbai 1: मेट्रोसह पब्लिक ट्रान्सपोर्टसाठीचा नवा साथी

नव्याने सुरू झालेल्या मेट्रो, बेस्ट बस, ट्रेन अशा पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी हे अधिकृत अ‍ॅप आहे. रांगेत न उभे राहता मोबाईलवर QR तिकीट मिळवण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो.

MyBMC 24x7: तुमची तक्रार, पालिकेचे उत्तर

रस्त्यावरील खड्डे किंवा साचलेल्या कचऱ्याची तक्रार करण्यासाठी आता वॉर्ड ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. 'MyBMC' अ‍ॅपवर फोटो अपलोड करा आणि तुमची तक्रार थेट प्रशासनापर्यंत पोहोचवा. महापालिकेसंबंधीत छोट्या छोट्या समस्यांसाठी हे अॅप फायदेशीर आहे.

(नक्की वाचा- Railway Block: गोरेगाव-सीएसएमटी सेवा 3 महिने बंद राहणार, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होणार 'मेगा'हाल)

MTP App (मुंबई ट्रॅफिक): दंड आणि नियम

जर तुम्ही स्वतःची गाडी चालवत असाल, तर हे अ‍ॅप महत्त्वाचे आहे. तुमची गाडी कुठे टो (Tow) झाली आहे का, किंवा चुकून वाहतूक नियम मोडल्यास किती ई-चलन आले आहे, हे यावर तपासता येते.

112 India: संकटकाळात मदतीचा हात

हे अॅप केवळ मुंबईसाठीच नाही, तर संपूर्ण भारतासाठी महत्त्वाचे सुरक्षा अ‍ॅप आहे. पोलीस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची मदत हवी असल्यास एका बटणावर तुमची माहिती नियंत्रण कक्षाला पोहोचते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com