Pune News: NDTVच्या दणक्यानंतर सरकारला जाग! अखेर त्या 100 शववाहिन्यांचे वाटप सुरू

NDTV News impact: तब्बल 35 कोटींच्या खरेदीमागे काही काळंबेरं आहे का असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर आता प्रशासनाने या गाड्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे: राज्याचे माजी आरोग्यमंत्रीतानाजी सावंत यांच्या कार्यकाळात 35 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या. तब्बल 35 कोटींच्या या शववाहिका तीन महिन्यांपासून अधिक काळ लोटला तरी वाटप न करता धुळखात पडल्याची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती. एनडीटीव्हीच्या या बातमीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून आता या शववाहिकांचे वाटप सुरु झाले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एनडीटीव्ही मराठीने पोलखोल केल्यानंतर तीन महिन्यांपासून धुळखात पडलेल्या 100 नव्या कोऱ्या शववाहिन्यांचे वितरण सुरु झाले आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेत उभ्या होत्या. NDTV मराठीने घटनास्थळी जाऊन याचा आढावा घेतला होता, त्यानंतर प्रशासनावर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर आता या गाड्यांचे वाटप सुरु झाले आहे. 

शववाहिन्यांचे वाटप कसे होणार?

या 100 शववाहिकांपैकी नागपूरला 5 गाड्या, वाशिमला 3 गाड्या,16 दुर्गम आदिवासी जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 4 गाड्या, तसेच18 इतर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 2 गाड्या देण्यात येणार आहेत. दरम्यान एनडीटीव्ही मराठीने या गाड्या निष्क्रिय असल्याचा मुद्दा उचलल्यानंतर प्रशासनाला हालचाल करावी लागली. आता वाटप सुरू झाले असले तरी, तीन महिन्यांपर्यंत या शववाहिन्या जागच्या जागीच का उभ्या होत्या? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)

दरम्यान, जानेवारीमध्येच पहिल्या स्लॉटच्या काही गाड्या आल्या. त्यानंतर उरलेल्या गाड्या जानेवारी महिन्यात आल्या. पण तीन महिन्यांहून अधिक काळ पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेत उभ्या होत्या. अनेक काळ उभ्या असल्याने काहींच्या चाकातील हवा गेली तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या होत्या. तब्बल 35 कोटींच्या खरेदीमागे काही काळंबेरं आहे का असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर आता प्रशासनाने या गाड्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Advertisement