Pune News: पुणेकरांची धाकधूक वाढली, त्या दहशतीमुळे घराबाहेर पडण्याचीही भीती; दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम

Pune News: पुण्यातील काही परिसरात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pune Leopard Scare : पुणेकरांमध्ये दहशत वाढली, कारण..."
Canva AI

Pune News: पुणेकरांच्या भीतीमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढ होतेय. कारण काही दिवसांपूर्वी औंध परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता सांगवीसह आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. ब्रेमन चौकापर्यंत बिबट्या फिरल्याची चर्चा पसरताच सांगवीकर दहशतीत आहेत. बिबट्याच्या चर्चेमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतोय.  

स्थानिकांचे घराबाहेर पडणं कमी झालं

सांगवीकर परिसरातील शांत ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारणं पसंत करतात. पण बिबट्या फिरत असल्याच्या चर्चेमुळे अनेकांनी घराबाहेर पडणंच कमी केलंय. बहुतांश लोक पहाटे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळत आहे. इतकंच काय तर सोसायट्यांच्या आवारातही वर्दळ कमी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणंय. औंध परिसरात दिसलेला बिबट्या अजूनही पकडला गेलेला नाही, त्यामुळे स्थानिकांना घराबाहेर पडण्यास भीती वाटतेय.  

Advertisement

(नक्की वाचा: Pune News: मला माणसासारखं वागवलंच नाही, तरुणाने पुणे पोलिसांना दिला तळतळाट, VIDEOद्वारे समोर आणला क्रूर चेहरा)

वनविभागाने केलं स्पष्ट 

बिबट्याचा शोध सुरू आहे. प्राथमिक सीसीटीव्ही फुटेजनंतर कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा मिळालेला नाही, असे वनविभागाने स्पष्ट केलंय. 

(नक्की वाचा: Pune News: कान पकडायला लावून काढली धिंड, गाड्या फोडणाऱ्या भावांना पुणे पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल)

वनविभागाचे स्थानिकांना आवाहन

केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा असे सांगत वनरक्षक कृष्णा हाके म्हणाले की, "पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस एकटं बाहेर पडणं टाळा. घर आणि सोसायटी परिसरात पुरेसा प्रकाश असावा. ज्या रस्त्यांवर अंधार असेल तेथील बाकांवर बसणं टाळा. पाळीव कुत्र्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा. लहान मुलांना वर्दळ नसणाऱ्या ठिकाणी एकटे सोडू नका. बिबट्या दिसल्यास तत्काळ 1926 या क्रमांकावर संपर्क साधा".

दरम्यान परिसरात बिबट्या वावरत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने स्थानिक धास्तावले आहेत.