जाहिरात

Pune News : 8 व्या मजल्यावर लटकली, समोर चिमुकली मुलं उभी, पुढं जे घडलं... पुण्यातील काळीज पिळवटणारा VIDEO

मुलाची आईला वाचवण्याची धडपड सुरु होती, मात्र क्षणात हात सुटला अन् खाली कोसळून महिलेचा जीव गेला. या घटनेचा सुन्न करणारा व्हिडिओही समोर आला आहे. 

Pune News : 8 व्या मजल्यावर लटकली, समोर चिमुकली मुलं उभी, पुढं जे घडलं... पुण्यातील काळीज पिळवटणारा VIDEO

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Pune Women Ended Life Video: पुण्यामधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. सर्वात दुर्दैवी म्हणजे उडी मारल्यानंतर महिला बाल्कनीला लटकली होती. वरुन चिमुकल्या मुलाची आईला वाचवण्याची धडपड सुरु होती, मात्र क्षणात हात सुटला अन् खाली कोसळून महिलेचा जीव गेला. या घटनेचा सुन्न करणारा व्हिडिओही समोर आला आहे. 

Pune VIDEO: पुण्याच्या रस्त्यावर झोंबी? 2 तास 'तो' हललाच नाही, एकाच जागेवर उभा; व्हिडिओने खळबळ

आठव्या मजल्यावरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळेगाव एमआयडीसी परिसरातून एक अतिशय थरारक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील 'अर्बन लाईफ टावर' या आलिशान सोसायटीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. पतीसोबत झालेल्या जोरदार भांडणानंतर रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे.

प्रतिभा शंकर असे या मृत महिलेचे नाव असून, घटनेपूर्वी त्यांचे पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात प्रतिभा यांनी थेट बाल्कनीतून खाली उडी घेतली. ही संपूर्ण घटना शेजारील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून, व्हिडिओमध्ये महिला काही काळ बाल्कनीला लटकताना दिसत आहे.

लोकांनी आरडाओरडा करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षणार्धात तिची पकड सुटली आणि ८ व्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मुलांच्या डोळ्यादेखत आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Mothers Day 2026: मातृदिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा! 'हे' हृदयस्पर्शी मेसेज, कविता पाठवा; आईचा दिवस बनवा खास

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com