पुणे: पुण्यातील चंदन नगर भागात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या घरांमध्ये घुसून त्यांना बांगलादेशी ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कथित हिंदुत्ववादी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मानॉरीटीच्या वतीने आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली. यावेळी घटनेबद्दल नाराजगी व खेद व्यक्त करत सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या कुटुंबाच्या बाबत अशा प्रकारची घटना होणे अत्यंत वाईट आहे व अशा प्रकारची कृती करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. “ असे स्पष्ट आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
Jalgaon News: शाळेतच झाला विद्यार्थ्याचा Heart Attack नं मृत्यू! धक्कादायक घटनेनं सर्वच हादरले
दिनांक 26 जुलै रोजी रात्री उशिरा चंदन नगर येथे शमशाद शेख यांच्या घरामध्ये घुसून बजरंग दल , विश्व हिंदू परिषद व इतर सकल हिंदू समाज स्वतःला हिंदुत्वादी म्हणवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींनी गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी सदर कुटुंबीयांना रोहिंग्या, बांगलादेशी असे संबोधून त्यांची अवहेलना केली होती.
यासंदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने संबंधित कुटुंबीयांनी नॅशनल कॉन्फरन्सचे राहुल डंबाळे यांच्या उपस्थितीत आज पोलीस आयुक्त यांची भेट घेतली यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा व अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील यांचे अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शमसाद शेख (३५), जे हकीमुद्दीन शेख यांचे पुतणे आहेत, म्हणाले की त्यांनी २८ जुलै रोजी पोलिसांकडे अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती केली होती. हकीमुद्दीन शेख यांनी भारतीय लष्करातील 269 इंजिनीअर रेजिमेंटमध्ये १६ वर्षे सेवा बजावली असून १९९९ च्या कारगिल युद्धात त्यांनी भाग घेतला होता. सध्या ते उत्तर प्रदेशमध्ये राहतात.
Devendra Fadnavis: उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार