जाहिरात

Pune News: PMRDA चा मोठा निर्णय! 'या' 29 सेवा पूर्णपणे ऑनलाईन; घरबसल्या एका क्लिकवर होणार काम

पीएमआरडीएने आपल्या २९ महत्त्वाच्या सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन केल्या आहेत. या महत्त्वाच्या निर्णयामुळे कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची कटकट कायमची मिटणार आहे. 

Pune News: PMRDA चा मोठा निर्णय! 'या' 29 सेवा पूर्णपणे ऑनलाईन; घरबसल्या एका क्लिकवर होणार काम

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

PMRDA Online Services:  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या PMRDA हद्दीतील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी पीएमआरडीएने आपल्या २९ महत्त्वाच्या सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन केल्या आहेत. या महत्त्वाच्या निर्णयामुळे कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची कटकट कायमची मिटणार आहे. 

29 सेवा पूर्णपणे ऑनलाईन 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  पीएमआरडीएने आपल्या २९ महत्त्वाच्या सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार या सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, यापुढे कोणताही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे अधिकृत परिपत्रक महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहे. या निर्णयामुळे नागरिकांना घरबसल्या दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे.

Chandrapur Congress: गल्लीत गोंधळ, दिल्लीत तोडगा, चंद्रपूरचा तिढा 'हाय कमांड' सोडवणार

सरकारी कार्यालयाचे हेलपाटे बंद

या निर्णयामुळे  सरकारी कार्यालयांचे हेलपाटे थांबणार असून मध्यस्थांची गरजही उरणार नाही. विशेष म्हणजे, या सेवा लोकसेवा हक्क कायद्याच्या चौकटीत येत असल्याने प्रशासनाला त्या ठराविक कालमर्यादेत देणे बंधनकारक आहे. यामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.

यात  इमारत बांधकाम परवानगी, जोता मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा आणि सुधारित बांधकाम परवानगी. सदनिका किंवा भूखंड हस्तांतरण, वारस नोंद, कर्जासाठी ना-हरकत प्रमाणपत्र  आणि भूखंडांची फेरमोजणी  त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे ना-हरकत दाखले आणि पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र या सेवांचा समावेश आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांना विहित वेळेत सेवा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Pune Porsche Accident: पुणे पोर्श अपघात प्रकरण! 18 महिन्यानंतर तिघांना जामीन

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com