Pune News: पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे पेठ, खराडी, बाणेर-सुस रस्ता आणि हडपसर परिसरात व्यापक मोहीम राबवत हजारो चौरस फूट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
खराडी आणि बाणेरमध्ये मोठी कारवाई
18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता खराडी, बाणेर–सुस रस्ता (बी.डी.पी. झोन) तसेच हडपसरच्या नवीन हद्दीतील चिंतामणी नगर आणि दुगड नगर परिसरात प्रशासनाने धडक कारवाई केली. उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार यांच्या थेट नियंत्रणाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण 30,600 चौरस फुट अनधिकृत कच्चे आणि पक्के बांधकाम पूर्णतः हटवण्यात आले. जेसीबी, एम.एस.एफ. जवान आणि पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही कारवाई शांततेत पार पडली.
(नक्की वाचा: Baba Bangali Arrested: मुंबई लोकलमधील बाबा बंगालीचा पर्दाफाश, वशीकरण-प्रेमविवाहाचा दावा अंगलट, पोलिसांची कारवाई)
पेठ परिसर आणि हडपसरमध्येही हातोडा
यापूर्वी 17 फेब्रुवारी रोजी देखील महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पेठ सर्वे क्रमांक 6 व 76, खराडी (सय्यद नगर), नवीन हडपसर हद्द आणि सदाशिव पेठ परिसरात कारवाई करण्यात आली होती. या मोहिमेत 17,500 चौरस फुटावरील बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच 185 हातगाड्या, पथारी आणि काउंटरवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा: Shivneri Fort Stampede: शिवनेरीवर शिवजयंतीला गालबोट; अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी, महिला-मुलांसह अनेक शिवभक्त जखमी)
प्रशासनाचा कडक इशाराशहराच्या सुव्यवस्था आणि नियोजनबद्ध विकासासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.