Pune News: ऋषीराज सावंत बेपत्ता प्रकरणात ट्विस्ट! तानाजी सावंत यांचा खुलासा; तो चार्टर प्लेनने...

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमानतळावरुन बेपत्ता झाल्याची तक्रार आली आणि पोलिसांची धावपळ उडाली. मात्र या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमानतळावरुन बेपत्ता झाल्याची तक्रार आली आणि पोलिसांची धावपळ उडाली. मात्र या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आला असून स्वतः तानाजी सावंत यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेमकं काय घडलं? 

शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर आली. ऋषीराज तानाजी सावंत (वय 35) याचे पुणे विमानतळावरुन अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. 

आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरातून स्विफ्ट गाडीतून त्याचे अपहरण करण्यात आले अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र स्वत: तानाजी सावंत यांनी पुणे पोलिसांसोबत पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले. 

( नक्की वाचा :  धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांना का सोडलं? मुलानं केला खळबळजनक खुलासा )

काय म्हणाले तानाजी सावंत?

"माझा मुलगा ऋषीराज कधीही न सांगता घराबाहेर पडत नाही. मात्र तो काहीही न कळवता थेट विमानतळावरुन बाहेर गेल्याने काळजी वाटली आणि मी किडनॅपिंगची तक्रार दिली. मात्र त्याच्यासोबत त्याचेच दोन मित्र आहेत. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत, असे स्पष्टीकरण तानाजी सावंत दिले आहे. 

तसेच "ऋषीराज कुठेही जाताना मला किंवा माझ्या मोठ्या मुलाला सांगतो. मात्र इथे न सांगताच घराबाहेर पडला आणि त्याची गाडीही त्याच्यासोबत नव्हती, त्यामुळेच मला चिंता वाटली. अचानक तो एअरपोर्टवर कसा गेला म्हणून मी सीपी साहेबांना फोन केला. पण आता कळलं तो चार्टरने बाहेर गेला आहे.  तशी माहिती त्याच्या ड्रायव्हरने दिली,  आम्ही त्याची माहिती घेत आहोत. तो मित्रांसोबत विशाखापट्टणमला गेले असून आता पुण्याकडे येत असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. 

Advertisement