राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Tanaji Sawant's son Bangkok tour : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाच्या बातमीने खळबळ उडाली होती. 10 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत (वय 32) पुणे विमानतळावरुन बेपत्ता झाल्याची तक्रार आली आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली. मात्र याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. तानाजी सावंत यांचे सुपूत्र ऋषिराज सावंत स्वखुशीने दोन मित्रांसह तब्बल 68 लाख खर्च करून पुणे विमानतळावरुन खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉककडे निघाल्याची माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सावंत सुपूत्र यांचं खासगी चार्टर्ड बँकॉकडे निघालं होतं. हे विमान अंदमान निकोबारपर्यंत गेलं होतं. मात्र तातडीने हे विमान चेन्नईला लँड करण्यात आलं आणि तिथूनच त्याला पुण्याला बोलावून घेण्यात आलं. रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान ऋषिराज सावंत हा पुण्यात दाखल झाला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होता. तब्बल 68 लाख रुपये खर्च करून तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला निघाला होता, अशी माहिती आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!
आमदारांच्या मुलासाठी पोलिसांची कसरत
मुलगा न सांगताच कुठेतरी गेल्याचं कळताच तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या सगळ्यांना फोन लावून यंत्रणा सतर्क केली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने सावंतांनी मुलाचं खासगी विमान परत बोलावलं. अंदमान निकोबारपर्यंत गेलेलं विमान चेन्नई विमानतळावर उतरवण्यात आलं. या प्रकरणात पोलीस सर्वांची चौकशी करणार आहेत, त्यात काही तथ्य आढळलं तर पुढची कारवाई होईल, असंही सांगितलं जात आहे.
तानाजी सावंत यांच्या मुलामुळे प्रशासनावर ताण
सुरुवातील तानाजी सावंत यांच्या सुपूत्राच्या अपहरणनाट्याने गदारोळ उडाला होता. त्याच्यासाठी बँकॉकला चाललेले विमान विशाखापट्टणमला उतरवून पुण्यात आणण्यात आले. माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे सोमवारी खळबळ उडाली. चौकशीत सावंत यांचा मुलगा मित्रांसोबत खासगी विमानाने बँकॉक येथे जाणार असल्याचे उघड झाले. त्यानंतर कायदेशीर पाठपुरावा करून ते विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरविण्यात आले. दुपारी दोनपासून सुरू झालेल्या या नाट्यावर रात्री नऊच्या सुमारास पडदा पडला. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे पोलीस व विमानतळ प्रशासनाची धावपळ झाली व यंत्रणेवर नाहक ताण पडला. सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांचं अपहरण झाले आहे, तो खासगी विमानाने बँकॉकला रवाना झाला आहेत, सावंत यांना मुलाचे अपहरण झाल्याचा फोन आला होता, अशी विविध माहिती सोमवारी दुपारनंतर समाज माध्यमांवर व्हायरल झाली.
नक्की वाचा - Pune News: ऋषीराज सावंत बेपत्ता प्रकरणात ट्विस्ट! तानाजी सावंत यांचा खुलासा; तो चार्टर प्लेनने...
नेमकं काय झालं ?
■ लोहगाव विमानतळावरून उड्डाण झालेल्या विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी तपासली
■ विमानतळ आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले
■ ऋषिकेश दोन मित्रांसमवेत परदेशात जात असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न
■ ते विमान विशाखापट्टणम येथे उतरविले
■ तेथून विमान पुन्हा पुण्यात आणले