Pune News: नवले ब्रीज ठरतोय अपघाताचा 'हॉटस्पॉट', 24 तासात 3 दुर्घटना, तिघांनी जीव गमावला

नवले पूल पुन्हा एकदा अपघातांमुळे चर्चेत आला असून वाहन चालकांनी सांभाळून गाड्या चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: पुण्यातील नवले ब्रीज अपघातांचा हॉटस्पॉट बनत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये नवले पूलावर तीन भीषण अपघात झाल्याचे समोर आले असून यामध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नवले पूल पुन्हा एकदा अपघातांमुळे चर्चेत आला असून वाहन चालकांनी सांभाळून गाड्या चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलावर 24 तासात  3 मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  2 मे आणि 3 मे रोजी नवले पुलावर 24 तासात झालेल्या 3 वेगवेगळ्या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  3 मे ला पहाटेच्या सुमारास सिंहगड रोड परिसरात असलेल्या या पुलावर भरधाव वेगात येणाऱ्या मर्सिडीज ने एका दुचाकीस्वाराला धडक दिली ज्याच्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचसोबत असलेल्या प्रवासी गंभीर जखमी झाला 

कुणाल हुशार अस मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच नाव आहे तर कारचालक शुभम भोसले (23) अस ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अहवालात असंही समोर आले की कारचालक आणि त्याचे सहप्रवासी मित्र यांनी मद्यप्रशान केले होते .गाडी इतकी वेगात होती की उड्डाणपुलावरून गाडी खाली पडली.

नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप

गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्याने त्यातील सगळे बचावले पण गंभीर जखमी देखील झाले; या प्रकरणात कारचालक म्हणजे शुभम भोसले याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे  या अपघातानंतर दुपारच्या सुमारास एका ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने एका दुचाकीस्वाराला चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहिल्या घटनेच्या स्थळावरून 300 मीटर च्या अंतरावर आहे. या प्रकरणी ट्रक चालक संजार बिराजदार याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे 

Advertisement

तर 2 मे रोजी सकाळी 7 च्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली आणि तिकडून तो पसार झाला. सकाळी आपल्या कामाला निघालेल्या किरण गावडे-पाटील यांना ट्रक ने धडक दिली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या पुलावरचे अपघातांच सत्र हे सुरूच राहिलेले पाहायला मिळत आहे. 

नक्की वाचा - Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?