Pune News: 'त्या' घटनेनंतर संतापाची लाट! ग्रामस्थांनी नराधमाचा ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने बलात्कार आणि खुन प्रकरणातील आरोपीचे घर आणि घरासमोर उभा असणा-या टँक्टरला आग लावण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

 अविनाश पवार, पुणे: पुण्यातील मांजरेवाडी धर्म (ता खेड ) येथे एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी नराधम आरोपी नवनाथ कैलास मांजरे याला अटक करण्यात आली असून आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अज्ञातांनी या आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजगुरुनगर जवळील गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचार आणि नंतर निघृण हत्येच्या संतापजनक घटनेनंतर रात्रीच्या अंधारात थेट आरोपीच्या घरासमोर आक्रोशाचा उद्रेक केला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने बलात्कार आणि खुन प्रकरणातील आरोपीचे घर आणि घरासमोर उभा असणा-या टँक्टरला आग लावण्यात आली.

यामध्ये घरातील साहित्य आणि टँक्टर जळुन खाक झाला असुन या प्रकरणी आता राजगुरुनगर पोलीसांत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गावात तणावाचे वातावरण असल्याने आरोपीच्या घराला राजगुरुनगर पोलीसांचे संरक्षण देण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्यात आला असून, घराच्या खिडकीतुन आगीचे बोळे आत फेकल्याने आग घरातही आग लागली. यावेळी राजगुरुनगर पोलिसांसह आग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवले असून, आरोपीच्या घरासमोर दोन पोलीसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)

दरम्यान, आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आले असून गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही.अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका )