Pune News: श्रीमंतीचा माज, भरचौकात नंगानाच... BMW मधून उतरला अन्.. पुण्यातील घटनेने संताप

Pune BMW Viral Video: शास्त्रीनगर चौकामध्ये मद्यधुंद तरुणाने गाडीतून उतरून महिलांसमोर अश्लील चाळे केले. सकाळच्या सुमारास शास्त्री चौकात निळ्या रंगाच्या बीएमडब्लू गाडीतून उतरुन या तरुणाने लघुशंका केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीने कळस गाठल्याचे दिसत आहे. शहरामध्ये क्षुल्लक कारणावरुन मारहाण, जीवघेणे हल्ले, खूनाच्या घटना सर्रास घडत आहेत. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनाही घडत असून नुकत्याच घडलेल्या स्वारगेट बलात्काराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता पुण्यामध्ये एका श्रीमंत बापाच्या मुलाने भररस्त्यात अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये एका मद्यधुंद बीएमडब्लू चालकाने भररस्त्यात अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकामध्ये मद्यधुंद तरुणाने गाडीतून उतरून महिलांसमोर अश्लील चाळे केले. सकाळच्या सुमारास शास्त्री चौकात निळ्या रंगाच्या बीएमडब्लू गाडीतून उतरुन या तरुणाने भररस्त्यात लघुशंका केली.

तरुण आणि गाडीतील त्याचा मित्र दोघेही मद्यधुंदावस्थेत होते. आज सकाळच्या सुमारास तरुणाचा सिग्नलवर अश्लीलपणा एकानं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लोकांनी हटकल्यानंतरही या तरुणाने उर्मटपणा केला त्यानंतर फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले.  MH-12 RF8419 असा या गाडीचा क्रमांक होता, स्थानिक लोकांनी त्यांना ओळखले असून आणि पोलिसांना माहिती दिली आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. 

(नक्की वाचा- कशाला एवढं ताणता, जीवावर उठता का? तो फोन... आपल्यासोबत बरंवाईट होणार हे देशमुखांना कळलं होतं?)

दुसरीकडे, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने कोयत्याने वार केल्याने तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी रात्री सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. क्रवारी सायंकाळी दाम्पत्य दुचाकीवरून घरी निघाले होते. सिंहगड रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयाजवळ दुचाकीवरुन टोळके निघाले होते.त्या वेळी किरकोळ कारणावरून दाम्पत्याचा टोळक्याशी वाद झाला. यावरुनच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. 

Advertisement

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: 'बोल सुदर्शन घुले बाप..., 'त्या' 15 व्हिडिओंची A to Z स्टोरी; वाचून काळजाचा थरकाप उडेल)