जाहिरात

Santosh Deshmukh Case: 'बोल सुदर्शन घुले बाप..., 'त्या' 15 व्हिडिओंची A to Z स्टोरी; वाचून काळजाचा थरकाप उडेल

Santosh Deshmukh Murder: या सर्व व्हिडिओंमध्ये आरोपींनी कौर्याची परिसीमा गाठली. त्या सर्व व्हिडिओमध्ये आरोपींनी केलेल्या कृत्याची माहितीच आता समोर आले आहे.

Santosh Deshmukh Case: 'बोल सुदर्शन घुले बाप..., 'त्या' 15 व्हिडिओंची A to Z स्टोरी; वाचून काळजाचा थरकाप उडेल

Santosh Deshmukh Murder Case: मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयंकर फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वाल्मिक कराडच्या गँगमधील सहा जणांनी अत्यंत निर्दयीपणे संतोष देशमुख यांचा खून केला, या अमानुष मारहाणीवेळी आरोपींनी 15 व्हिडिओ आणि फोटो काढले. या सर्व व्हिडिओंमध्ये आरोपींनी कौर्याची परिसीमा गाठली. त्या सर्व व्हिडिओमध्ये आरोपींनी केलेल्या कृत्याची माहितीच आता समोर आले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे त्या व्हिडिओमध्ये?

व्हिडीओ क्रमांक 1 (1 मिनिट 10 सेकंद): पाच लोकं हातात पांढऱ्या रंगचा पाईप व वायरसारख्या हत्याराने तसेच लाथा-बुक्याने संतोष देशमुख यांना शिवीगाळ करून मारहाण करताना दिसत आहेत.

व्हिडीओ क्रमांक 2 (53 सेकंद): तपकीरी रंगाचा पाईप मारहाण होत असलेल्या संतोष देशमुख यांच्या पाठीजवळ पडलेला दिसत आहे. सोबतच याचवेळी एक आरोपी देशमुख यांनी पॅन्ट काढताना दिसत आहे.

व्हिडीओ क्रमांक 3 (35 सेकंद): एक आरोपी हा बुटाने लाथ घालत आहे संतोष देशमुख यांना शिवीगाळ मारहाण करत असून, दुसरा आरोपी हातात वायरसारखे हत्यार घेवून पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करताना दिसत आहे. 

व्हिडिओ क्रमांक 4 (2 मिनिट 4 सेकंद): एक आरोपी संतोष देशमुख यांना शिवीगाळ करून तपकीरी रंगाच्या लवच्चोक पाईपने मारहाण करत असून, दुसरा व्यक्ती मोबाईलमध्ये शुटींग करताना दिसत आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी आरोपी महेश केदार दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये एक काळया रंगाची स्कार्पिओ दिसत असून त्याच्या पाठीमागील नंबर प्लेटवर काही अस्पष्ट व 333 हा नंबर स्पष्टपणे दिसत आहे.

व्हिडिओ क्रमांक 5 (7 सेकंद): एक आरोपी मारहाण झालेल्या संतोष देशमुख यांच्या कॉलरला पकडून उठवून बसवत असल्याचे दिसत आहेत.

(नक्की वाचा- Budget Session 2025: फक्त घोषणा, धनंजय मुंडेंनी खरंच राजीनामा दिला का? सभागृहात राडा)

व्हिडिओ क्रमांक 6 (36 सेकंद): हातात तपकीरी रंगाचा पाईप घेतलेला आणि आणखी एकजण अर्धवट दिसत आहे. याच व्हिडीओत संतोष देशमुख यांच्या तोंडावर मारहाण झाल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ क्रमांक 7 (14 सेकंद): आरोपी संतोष देशमुख यांना हातातील तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण करताना दिसत आहे. याच मारहाणीचा व्हिडीओ शूटिंग करतांना एका आरोपीचा हात दिसत आहे.

व्हिडिओ क्रमांक 8 (52 सेकंद): एक आरोपी हातात तपकरी रंगाचा लवचीक पाईप घेतलेला तसेच आणखी एकजण असे दोघेजण मारहाण झालेल्या संतोष देशमुख यांना जबरदस्तीने काही तरी विचारत असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ क्रमांक 9 (02 सेकंद): मारहाण झालेल्या संतोष देशमुख यांना जबरस्तीने सुदर्शन घुले हा 'सगळांच्या बाप आहे' असे म्हणायला लावून, देशमुख यांना जमिनीवर पाडून दुसरा आरोपी संतोष देशमुख यांच्या तोंडात उभ्याने लघवी करताना दिसत आहे

व्हिडिओ क्रमांक 10 (05 सेकंद): जखमी संतोष देशमुख यांच्या अंगातील कपडे काढून, उघडे करुन बसल्याचे दिसत आहे. तसेच एक आरोपी तपकीरी रंगाच्या पाईपने पाठीत मारहाण करताना व दुसरा व्यक्ती शुटींग घेताना देसत आहे.

(नक्की वाचा-  Exclusive : संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, मन सून्न करणारी माहिती समोर)

व्हिडिओ क्रमांक 11 (12 सेकंद): जखमी संतोष देशमुख अंगातील कपडे काढून उघडे करुन एक व्यक्ती शूटिंग करतांना दिसत आहे.

व्हिडिओ क्रमांक 12 (44 सेकंद): जखमी संतोष देशमुख यांच्या अंगातील कपडे काढून उघडे बसवून त्यांचे केस ओढुन त्यांना जबरदस्तीने बोलण्यास लावून शुटींग करताना एका  व्यक्तीचा हात दिसत आहे. 

व्हिडिओ क्रमांक 13 (04 सेकंद): या व्हिडीओत संतोष देशमुख यांना जखमी अवस्थेत उलटे झोपवल्याचे दिसत असून त्यांच्या अंगात रक्ताचे डाग असलेली काळ्या रंगाची पॅन्ट दिसत आहे.

व्हिडिओ क्रमांक 14 (24 सेकंद): या व्हिडीओत मारहाण करण्यात आलेले जखमी संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेला शर्ट घालाण्याकरता त्यास उठवून बसवताना एक आरोपी दिसत आहे. त्यापूर्वी तो त्याच्या हातातील फाटलेले व रक्ताचे डाग असलेले बनियन फेकून देताना दिसत आहे.

व्हिडिओ क्रमांक 15 (04सेकंद): अंधारामुळे व्हिडीओ स्पष्ट दिसत नाही. पण या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीचा त्रास होत असल्याचा आवाज येत आहे.